ही घटना सिंगापूरमधील एका नामांकित प्रायव्हेट हॉस्पिटलमधील आहे. 43 वर्षांची एलिपे शिवा नागु नावाची भारतीय नर्स या रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. परंतु जून महिन्यात तिच्या एका कृतीने संपूर्ण हॉस्पिटल प्रशासन हादरून गेले.
एका दिवशी एक तरुण आपल्या आजोबांना भेटायला या रुग्णालयात आला होता. तो वॉशरूममध्ये गेला असताना, नर्स एलिपे त्याच्यामागोमाग गेली आणि आत डोकावलं. काही क्षणातच तिने आपल्या हातावर साबण लावून त्या तरुणाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. त्या क्षणी पीडित तरुणाला धक्का बसला त्याला काय घडतंय हेच समजलं नाही. तो शांतपणे परत आजोबांच्या खोलीत गेला, पण काही तासांतच हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या कानावर गेला.
advertisement
तपास सुरू झाल्यावर नर्सने दिलेलं स्पष्टीकरण आणखी विचित्र होतं. ती म्हणाली “मी त्याला डिसइन्फेक्ट करायचं ठरवलं होतं, म्हणजे जंतूसंसर्गापासून वाचवण्यासाठी.” मात्र हे कारण कोणालाच पटलं नाही. हॉस्पिटलने तिला तत्काळ सस्पेंड केलं आणि प्रकरण पोलिसांकडे सोपवलं.
या प्रकारानंतर सिंगापूर पोलिसांनी तिला अटक केली आणि कोर्टात सादर केलं. कोर्टाने हा प्रकार लैंगिक छळ आणि विश्वासघाताचा गंभीर गुन्हा मानला. न्यायालयाने एलिपेला 14 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 फटके मारण्याची शिक्षा सुनावली.
सिंगापूरमध्ये फटक्यांची शिक्षा अत्यंत दुर्मिळ आणि फक्त गंभीर गुन्ह्यांमध्येच दिली जाते. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने रुग्णालयांतील सुरक्षाव्यवस्था आणि सीसीटीव्ही मॉनिटरिंग अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
