मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील ही धक्कादायक घटना आहे. बबलू दंडोलिया आणि राजकुमारी हे कपल. त्यांना मुलगा झाला. हे बाळ अवघ्या तीन दिवसांचं झालं तेव्हा या दाम्पत्याने त्याला नंदनवाडी गावातील घनदाट जंगलात नेलं. त्याला दगडाखाली ठेवून दोघंही तिथून पळून गेले.
हरवलेला फोन सापडला, आनंदी झाला, पण गॅलरी उघडली आणि घामच फुटला, असं काय होतं त्यात?
advertisement
बाळ रडू लागलं. जंगलाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरील लोकांना बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू लागले. त्यामुळे लोक तिथं पोहोचले. आवाज दगडाखालून येत असल्याचं त्यांनी ऐकलं. दगड बाजूला हटवला, तेव्हा दृश्य पाहून सगळ्यांच्या काळजात चर्रर्रर्र झालं. दगडाखाली जिवंत बाळ, रक्ताने माखलेलं, थंडीत थरथर कापत होतं, बाळाला मुंग्यांनी वेढलेलं, त्याचं नाजूक शरीर चावलेल्या गंभीर जखमांनी भरलं होतं. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.
ताबडतोब रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि मुलाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. संसर्ग आणि जखमांमुळे त्याचा जीव धोक्यात आला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहे.
आजोबांनी ठेवलं नातीचं नाव! कोर्टात पोहोचलं प्रकरण, पालकांची होणार DNA टेस्ट, पण का?
याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली. फॉरेन्सिक तपासणी आणि साक्षीदारांच्या जबाबातून हत्येचा कट रचल्याचं उघड झालं. राजकुमारीने घरीच मुलाला जन्म दिला आणि काही तासांनंतर पती-पत्नी मुलाला नंदनवाडी जंगलात घेऊन गेले. तिथे नवजात बाळाला दगडाखाली ठेवून तिथंच सोडून देण्यात आलं. यामागील कारणही धक्कादायक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपलला आधीच तीन मुलं होती, दोन मुली आणि एक मुलगा. बबलू सरकारी शाळेत शिक्षक. जर त्यांच्या चौथ्या मुलाची बातमी सार्वजनिक झाली तर नोकरी धोक्यात येईल, अशी भीती त्यांना होती. मध्य प्रदेश नागरी सेवा नियमांनुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचं तिसरं मूल 26 जानेवारी 2001 नंतर जन्माला आलं तर ते त्यांच्या नोकरीसाठी अपात्र मानले जातात. म्हणून दाम्पत्याने असं क्रूर पाऊल उचललं.
एकाच कुटुंबातील 11 सदस्यांना मृत्यूदंड, 11 जणांना जन्मठेप, गुन्हा असा की सैतानही घाबरेल
आरोपी जोडप्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 120-ब (कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.
