एका सामान्य श्रेणीच्या डब्यात 250-300 प्रवासी बसू शकतात. राजधानी, शताब्दी इत्यादी प्रीमियम ट्रेनमध्ये साधारणपणे प्रति डबा सुमारे 72 जागा असतात. स्लीपर क्लासच्या डब्यांमध्ये जवळपास 72 जागा असू शकतात. पण एकदा असं घडलं की ट्रेनने फक्त एकाच प्रवाशासाठी प्रवास केला. घटना सप्टेंबर 2020 ची आहे. एका मुलीच्या आग्रहापुढे भारतीय रेल्वेला नमतं घ्यावं लागलं आणि फक्त तिच्या एकटीसाठी राजधानी एक्सप्रेस ट्रेनला प्रवास करावा लागला. 535 किलोमीटरचा प्रवास करून ही मुलगी पहाटे 1 वाजून 45 मिनिटांनी रांचीला पोहोचली.
advertisement
रस्त्यावर 15 वर्षे जुनी गाडी चालवत आहात, तर जाणून घ्या हे नियम, अन्यथा...
एका आंदोलनामुळे रांचीच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस डाल्टनगंज रेल्वे स्थानकावर थांबवावी लागली. येथून रांचीचं अंतर 308 किलोमीटर होतं. ट्रेनमध्ये 930 प्रवासी होते. रेल्वेने बसेसची व्यवस्था करून 929 प्रवाशांना रांचीला पाठवलं. मात्र अनन्या चौधरी नावाच्या महिला प्रवाशाने बसने जाण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती तयार झाली नाही. ती म्हणाली, मी राजधानी एक्स्प्रेसनेच जाईन. बसने जायचं असतं तर रेल्वेचं तिकीट का काढलं असतं? शेवटी अधिकाऱ्यांनाही तिच्या आग्रहापुढे झुकावं लागलं.
नंतर जेव्हा ट्रॅक रिकामा झाला तेव्हा ट्रेनला रांचीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. अशा स्थितीत एकच प्रवासी घेऊन ही गाडी चालवण्यात आली. रेल्वे कायद्यानुसार, प्रवाशांना त्यांनी तिकीट काढलेल्याच ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर रेल्वेला त्यांची विनंती मान्य करावी लागेल. मात्र, बहुतेक प्रसंगी अशी परिस्थिती उद्भवत नाही आणि लोक रेल्वेकडून आलेली विनंती स्वीकारतात. रेल्वेच्या इतिहासातील ही बहुधा पहिलीच वेळ होती, ज्यात केवळ एका प्रवाशाला घेऊन राजधानी एक्सप्रेसने 535 किलोमीटरचं अंतर कापलं .
