रस्त्यावर 15 वर्षे जुनी गाडी चालवत आहात, तर जाणून घ्या हे नियम, अन्यथा...

Last Updated:

जर तुमचे वाहन फिटनेसच्या दृष्टीने योग्य आहे, तर तुम्ही त्या गाडीचे नूतनीकरण करू शकतात.

फाईल फोटो
फाईल फोटो
अभिनव कुमार, प्रतिनिधी
दरभंगा, 12 ऑक्टोबर : जर तुम्ही 15 वर्षे जुनी गाडी रस्त्यावर चालवत असाल तर आताच सावधान व्हा. ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही जर असं करत असाल तर तुम्हाला फटका बसू शकतो. शासकीय परिवहन कायद्यानुसार, 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने चालवणे बेकायदेशीर मानले जाते. त्यासाठी दंडही ठरविण्यात आला आहे. मात्र, तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका.
advertisement
15 वर्ष जुनी गाडी तुम्ही रस्त्यावर चालवू शकता. मात्र, त्यासाठी काही नियम आहेत. जर तुमची कार 15 वर्षे जुनी असेल तर तुम्हाला तिचे नूतनीकरण करावे लागेल. हे नूतनीकरण पुढील 5 वर्षांसाठी असते. त्याची प्रक्रिया काय आहे, ते जाणून घेऊया.
जिल्हा परिवहन अधिकारी काय म्हणाले?
दरभंगाचे जिल्हा परिवहन अधिकारी राजेश कुमार म्हणाले की, जर तुमचे वाहन फिटनेसच्या दृष्टीने योग्य आहे, तर तुम्ही त्या गाडीचे नूतनीकरण करू शकतात. यामध्य़े वाहनाची पडताळणी होते. MVI त्या वाहनाची फिटनेस चेक करतात. यानंतर वाहनाची सर्व कागदपत्रे बरोबर असली पाहिजेत आणि चलनही सादर केले पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या वाहनाचे 5 वर्षांसाठी नूतनीकरण करू शकता.
advertisement
काय आहे निकष -
यामध्ये सर्वात आधी तुमचे वाहन हे फिटनेसच्या दृष्टीने वैध असावे. वाहनाचा विमा उतरवला पाहिजे आणि त्याची फिटनेस चांगली असावी. यानंतर तुम्ही डीटीओ कार्यालयात अर्ज सादर करू शकता. याठिकाणी तुम्हाला चलनही जमा करावे लागेल. हे चलन प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र असते. बसचे चलन किती आहे, ट्रकचे किती चलन आहे आणि गाडीचे किती चलन आहे, याची सर्व माहिती काउंटरवर दिली जाते. तसेच दुचाकीसाठीही चलन असते, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/देश/
रस्त्यावर 15 वर्षे जुनी गाडी चालवत आहात, तर जाणून घ्या हे नियम, अन्यथा...
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement