लग्नात नवरा नवरीचं भांडण होतं, हाणामारी अशा घटना तर तुम्ही ऐकल्याच असतील. अनेकदा तर नवरा किंवा नवरी लग्नातून पळून जातात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर गराळा घालतोय. ज्यामध्ये नवरी लग्नातून पळून जाताना दिसतेय.
beer: बिअरच्या कॅनने व्यक्तीला बनवलं लखपती, पण कसं काय? नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवरी ड्रेस पकडून लग्नातून पळत आहे आणि नवरदेव तिच्या मागे पळतोय. शिड्या उतरुन खाली येताच नवरीसाठी प्रियकराची गाडी उभी असते. ती लगेच कारमध्ये उडी घेते आणि निघून जाते. मागे पळत नवरदेव तिला पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र तोपर्यंत ती गाडीत बसून धूम ठोकते. मग नवरदेव डोक्याला हात मारतो आणि पायातील शूज फेकतो. खाली बसून डोक्याला हात लावून तो दुःखी होतो.
advertisement
ninamariedaniele नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भरपूर कमेंट पहायला मिळाल्या. अनेकांनी या व्हिडीओला फेक म्हटलं आहे. फक्त प्रसिद्धीसाठी असा स्टंट व्हिडीओ केल्याच्या अनेक कमेंट लोकांनी केल्या आहेत.
दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा आहे की फेक हे स्पष्ट झालं नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवत आहे.