आज आपण अशाच एका परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे एक पुरुष विधवा महिलेशी लग्न करतो आणि नंतर तो तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीलाही आपली पत्नी बनवू शकतो. विशेष म्हणजे, ही परंपरा आपल्या शेजारील देशात, बांगलादेशात आजही पाळली जाते.
बांगलादेशातील विचित्र परंपरा...
आपल्या शेजारील देश बांगलादेशमध्ये 'मंडी' नावाची एक आदिवासी जमात आहे. या समाजात लग्नाबाबत असलेले नियम ऐकून अनेकांना प्रश्न पडतो की, असंही काही असू शकतं का? खरं तर, या समाजात गेल्या अनेक वर्षांपासून अशी परंपरा आहे की, वडील आपल्या मुलीशी लग्न करू शकतात. मात्र, यातही काही नियम आहेत.
advertisement
या आदिवासी जमातीत असा नियम आहे की, जर एखादा पुरुष एखाद्या विधवा महिलेशी लग्न करतो, तर तो नंतर त्या महिलेला तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीशीही लग्न करू शकतो. याचा अर्थ, जी मुलगी त्याला 'बाबा' म्हणते, तिलाच तो नंतर आपली पत्नी बनवू शकतो. या परंपेमागे मंडी जमातीचे लोक असं कारण देतात की, यामुळे आई आणि तिची मुलगी दोघांचीही सुरक्षा होते आणि एकाच व्यक्तीकडून संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली जाते.
मुलींचं होतं शोषण
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की, या पद्धतीने मुलींचं शोषण होतं. अशा प्रकारची परंपरा त्यांच्या बालपणावर मोठा आघात करते. वडिलांच्या प्रेमाऐवजी, नंतर त्यांना त्याच वडिलांशी लग्न करावं लागतं. मात्र, आता खूप कमी लोक ही परंपरा पाळतात.
हे ही वाचा : भर लग्नात नवऱ्याने दोन्ही हातांनी केली विचित्र कृती, नवरीला आला राग, रिकाम्या हाताने परत गेली वरात!
हे ही वाचा : अवघ्या 6 वर्षांचा लक्षित बनला 'इंटरनॅशनल आयकॉन', बुद्धीच्या जोरावर मिळवले आंतरराष्ट्रीय यश!