कबरी आणि क्रॉसवर स्टिकर्स आढळले : शहरातील 3 कब्रस्तानांमधील सुमारे एक हजार कबरी आणि लाकडी क्रॉसवर स्टिकर्स चिकटवण्यात आले आहेत, ज्यांना क्यूआर कोड जोडलेला आहे आणि हा क्यूआर कोड कामही करत आहे. या कोडचे स्टिकर्स सर्व नवीन आणि जुन्या कबरींच्या दगडांवर चिकटवलेले आढळले आहेत. विशेष म्हणजे, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर, कब्रस्तानात पुरलेल्या व्यक्तीचं नाव आणि त्याच्या कबरीचं ठिकाणही सापडतं.
advertisement
फक्त 3 कब्रस्तानात, इतर कुठेही नाही : हे 5×3.5 सेमी आकाराचे स्टिकर्स अलीकडच्या दिवसांत वाल्डफ्राइडहॉफ, सेंडलिंगर फ्राइडहॉफ आणि फ्राइडहॉफ सोलन या कब्रस्तानांमध्ये दिसले आहेत. पोलीस प्रवक्ते ख्रिश्चन ड्रेक्सलर म्हणतात की, असे नमुने इतर कुठेही आढळलेला नाही. हे स्टिकर्स जुन्या आणि नवीन दोन्ही कबरींवर लावण्यात आले आहेत. यामध्ये सध्या फक्त लाकडी क्रॉस असलेल्या नवीन कबरींचाही समावेश आहे.
तपास सुरू आहे : असे स्टिकर्स कोणीतरी लावताना पाहिल्यास, त्यांनी कब्रस्तान प्रशासनाला माहिती देण्यास सांगितलं आहे. सध्या, हे स्टिकर्स कोणी आणि कसे लावले हे अधिकाऱ्यांना शोधता आलेलं नाही. याशिवाय, यामुळे कोणत्याही मालमत्तेचं नुकसान झालं आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. होय, स्टिकर्स काढल्याने कबरींचं नुकसान होत आहे. ब्लू न्यूजच्या माहितीनुसार, गुटिंगमधील अल्फ्रेड जेनकर नावाच्या एका कंत्राटदाराने स्वतः पोलिसांना सांगितलं की, त्याने हे स्टिकर्स चिकटवले आहेत, पण जेनकर सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकला नाही. याशिवाय, पहिल्या चौकशीत कंपनीने या प्रकरणात आपला सहभाग नाकारला होता. सध्या, पोलीस तपास सुरू आहे.
हे ही वाचा : General Knowledge : स्त्रीया वर्षभर वापरल्यावर फेकुन देतात 'ही' गोष्ट, तुम्हाला माहितीय का उत्तर?
हे ही वाचा : 405 दिवस, 10 देश, 41 लाखांचा खर्च... ध्येयापर्यंत पोहोचला, पण शेवटी नशीब फुटकं निघालं अन् स्वप्न भंगलं...
