सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ 27 ऑक्टोबरला '@nouman.hassan1' इनस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 5 लाख 38 हजार व्ह्यूज आणि 13 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीसोबत वाघ दोन पायांवर उभा असल्याचं दिसत आहे. माणूस ज्याला मिठी मारतोय, यात तुम्ही बघू शकता की, वाघ माणसाच्या जवळ जाऊन त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो माणूस वाघाला स्वतःपासून कसं दूर ढकलतो.
advertisement
Weird Animal - अंधार होताच पाण्यात टॉर्च घेऊन पोहोतात मासे; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO
असे व्हिडिओ सोशल मीडियावर वेळोवेळी व्हायरल होतात आणि या व्यक्तीने असा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते वाघ आणि इतर प्राण्यांचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. जे पाहून यूजर्स हैराण झाले आहेत.
ही क्लिप पाहून लोकांनी त्यावर कमेंटही केल्या. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले - या सुंदर प्राण्याचे घर जंगल आहे. त्याला पाळीव प्राणी बनवू नये. आणखी एका यूजरने लिहिले - सिंहासोबत खेळण्यासाठी सिंहासारखे हृदय असावं.
