Weird Animal - अंधार होताच पाण्यात टॉर्च घेऊन पोहोतात मासे; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
टॉर्चसह पोहोणाऱ्या या माशांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : पाण्यात जितकं खोल जाल तितका अंधार होतो. सूर्याची किरणं काही अंतरापर्यंत पाण्यात पोहोचतात. अंधार झाल्यानंतर पाण्यात सर्वकाही काळंकुट्ट होतं. पण पाण्यातील मासे अंधारात कसे राहत असतील कधी विचार केला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल असे मासे आहेत जे पाण्यात अंधार होताच टॉर्च घेऊन फिरतात. या माशांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
जगभरात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्याबाबत आपल्याला माहिती नाही. असाच हा मासा जो टॉर्च घेऊन फिरतो. या माशाचं नावही फ्लॅशलाइट फिश आहे. त्याचं वैज्ञानिक नाव अॅनोमॅलोपिडे आहे. त्याला लँटर्न-आय फिश असंही म्हणतात. @gunsnrosesgirl3 एक्स अकाऊंटवर या माशाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता काळ्या रंगाचे हे मासे ज्यांचे डोळे चमकत आहेत.
advertisement
आता या माशाच्या शरीरात प्रकाश कसा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याच्या डोळ्याखाली बायोल्युमिनेसेंट अवयव आहे, जो चमकदार निळा-हिरवा प्रकाश उत्सर्जित करतो. Liveaquaria अहवालानुसार, फ्लॅशलाइट माशांच्या प्रकाश अवयवामध्ये लाखो बायोल्युमिनेसेंट बॅक्टेरिया असतात, जे सतत निळा-हिरवा प्रकाश निर्माण करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे मासे त्यांच्याद्वारे निर्माण होणाऱ्या प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करू शकतात, म्हणजेच ते वाढवू शकतात, कमी करू शकतात किंवा बंद करू शकतात.
advertisement
लँटर्न मासे भक्षक टाळण्यासाठी त्यांचा प्रकाश कमी करू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या माशांशी संवाद साधण्यासाठी प्रकाशाचा वापर करू शकतात.
Ces poissons lampes de poche produisent de la lumière bioluminescente et possèdent des organes qui leur permettent de la contrôler ! #TiredEarth #Nature #Ocean pic.twitter.com/MN2FJp4ZFM
— Marcel clément (@imarclement) July 30, 2022
advertisement
आता हे असे मासे कुठे पाहायला मिळतील. तर हे मासे इंडो-पॅसिफिक महासागर आणि कॅरिबियन समुद्रात आढळतात.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Nov 10, 2023 10:42 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Weird Animal - अंधार होताच पाण्यात टॉर्च घेऊन पोहोतात मासे; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO








