TRENDING:

Funny Video : चिमुकल्याला 700 रुपयांमध्ये 'थार' पाहिजे, प्लॅनिंग पाहून आवरणार नाही हसू!

Last Updated:

लहान मुलं जेवढी खट्याळ असतात तेवढीच निरागसही. बऱ्यादचदा ते असं काही बोलून जातात की त्यावर हसू येतं तर कधी कामाचं बोलून जातात. सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 25 डिसेंबर : लहान मुलं जेवढी खट्याळ असतात तेवढीच निरागसही. बऱ्यादचदा ते असं काही बोलून जातात की त्यावर हसू येतं तर कधी कामाचं बोलून जातात. सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच लहान मुलाचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ समोर आलाय. मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा मजेशीर व्हिडीओ नेमका काय आहे पाहुया.
चिमुकल्याला 700 रुपयांमध्ये 'थार' पाहिजे
चिमुकल्याला 700 रुपयांमध्ये 'थार' पाहिजे
advertisement

चिमुकल्याला 700 रुपयांमध्ये 'थार' कार हवीय. यासाठी त्याचं प्लॅनिंग पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. महिंद्राची थार कार 700 रुपयांमध्ये कशी येईल याविषयी मुलगा व्हिडीओमध्ये सांगतोय. हा व्हिडीओ पोस्ट करताच इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये मूल एका व्यक्तीशी बोलत आहे. तो सांगतो की त्याला एक थार कार घ्यायची आहे. महिंद्रा कंपनीच्या XUV700 कारचं नाव थार असल्याचं तो सांगतो. कारच्या पुढे 700 लिहिलं आहे कारण ती कार फक्त 700 रुपयांना मिळते, असं त्याचं म्हणणं आहे. मग तो पर्समध्ये असलेले 700 रुपये देऊन कंपनीच्या शोरूममध्ये जाऊन थारची गाडी घेईल.

advertisement

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 1 मिनिट 29 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट आणि लाईक्स येताना दिसत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, सोशल मीडियावर मुलांचे असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. अनेक व्हिडीओ चर्चेत येत असतात. मुले कधी काय करतील आणि काय तर्क लावतील याचा अंदाज लावणं अवघड आहे. मात्र त्यांचा निरागसपणा आणि खट्याळपणा नेटकऱ्यांचं मन जिंकत असतो.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Funny Video : चिमुकल्याला 700 रुपयांमध्ये 'थार' पाहिजे, प्लॅनिंग पाहून आवरणार नाही हसू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल