TRENDING:

वडीलांचा मृतदेह दोन वर्षं कपाटात ठेवला आणि… मुलाच्या कृत्यामागचं सत्य मन हेलावून टाकणारं

Last Updated:

पोलिसांनी तपास केला आणि एका कपाटात सडलेला सांगाडा त्यांना सापडला. तपासात समोर आलं की नोबुहिको यांचे वडील 86 वर्षांचे होते आणि त्यांचं निधन जानेवारी 2023 मध्येच झालं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जपानच्या टोकियो शहरात नोबुहिको सुजुकी नावाचे 56 वर्षांचे गृहस्थ एक चायनीज रेस्टॉरंट चालवत होते. काही काळापासून त्यांच्या रेस्टॉरंटवर कुलूप होतं. परिसरातले लोक हैराण झाले, इतकं चांगलं चालणारं रेस्टॉरंट अचानक बंद का झालं? असा प्रश्न अनेकांना पडला. या प्रश्नाचं रुपांतर संशयात झालं आणि तेव्हा पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांच्या समोर जे सत्य उघड झालं ते भयंकर होतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पोलिसांनी तपास केला आणि एका कपाटात सडलेला सांगाडा त्यांना सापडला. तपासात समोर आलं की नोबुहिको यांचे वडील 86 वर्षांचे होते आणि त्यांचं निधन जानेवारी 2023 मध्येच झालं होतं. म्हणजे जवळपास दोन वर्षं त्यांच्या वडिलांचा मृतदेह कपाटातच लपवून ठेवण्यात आला होता.

जेव्हा पोलिसांनी नोबुहिको सुजुकी यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते काळीज हलवणारं होतं. त्यांनी सांगितलं की वडिलांचं अचानक निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. जपानमध्ये अंत्यसंस्काराचा खर्च प्रचंड आहे आणि त्यामुळेच त्यांनी खरातील कपाटात त्यांना ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला.

advertisement

नोबुहिको सुजुकी म्हणाले "मी त्यांना सोडू शकत नव्हतो, पण खर्चही पेलवणार नव्हता."

आता या प्रसंगानंतर हा प्रश्न नक्कीच उभा रहातो की इतकं किती महाग असतो जपानमधील अंत्यसंस्कार?

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, जपानमध्ये एक सामान्य अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे 13 लाख येन म्हणजेच साडेसात लाख रुपये खर्च येतो. दाहसंस्कार, मंदिर सेवा, पुजारी, सजावट, ताबूत, आणि हाडांसाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचाही खर्च यामध्ये येतो. गरीब किंवा एकटं राहणार्‍या लोकांसाठी हा खर्च परवडण्यासारखा नसतो.

advertisement

केवळ पैसा नाही, तर एकटेपणाही कारणीभूत

ही घटना केवळ आर्थिक संकट दाखवत नाही, तर जपानमध्ये वाढत असलेलं सामाजिक एकटेपणही समोर आणते. भारतासारख्या देशात जिथे कुटुंब एकत्र येतात, तेथील लोकांना ही कहाणी धक्कादायक वाटू शकते. पण जपानसारख्या देशात, कधी कधी मृत्यूच्या वेळी सुद्धा कोणी जवळ नसतं. ही खरी शोकांतिका आहे.

मराठी बातम्या/Viral/
वडीलांचा मृतदेह दोन वर्षं कपाटात ठेवला आणि… मुलाच्या कृत्यामागचं सत्य मन हेलावून टाकणारं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल