भररस्त्यात दोन बैलांचं भांडण सुरु असतं. एक व्यक्ती येऊन त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबतच वाईट घडतं. बैल त्याच्यावरच हल्ला करुन पळून जातो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
चोराचा असा फसला फ्लॅन, सोन्याची चैन ओढणार इतक्यात....CCTV Video
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भररस्त्यात दोन बैल एकमेकांशी भांडत असतात. लोक आजूबाजूने त्यांचं भांडण बघतायेत मात्र एक व्यक्ती त्यांची भांडणं सोडवण्यासाठी येतो. सुरुवातीला तो एका बैलाची शेपटी पकडतो आणि ओढतो. मग तो दुसऱ्या बैलापाशी येतो आणि भांडू नका असं हातवारे करुन सांगतो. मात्र बैल रागाच्या भरात त्यालाच शिंगावर उचलून पाडतो. मग दोन्ही बैल तेथून पळून जातात.
advertisement
@Dharmeshspandey नावाच्या x अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 35 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवत आहे. काहीच वेळात व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.
दरम्यान, अशा प्राण्यांच्या भांडणाचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. या प्राण्यांच्या भांडणामध्ये पडल्यावर ते रागात कोणावरही हल्ला करु शकतात. त्यामुळे प्राण्यांच्या भांडणापासून खास करुन भटक्या प्राण्यांच्या भांडणापासून दूर राहणं गरजेचं आहे.
