अनेक लोक त्यांच्या मृत्यूनंतर बनारसमध्ये अंत्यसंस्कार करण्याची शेवटची इच्छा व्यक्त करतात. त्यांच्या जीवनाचा उद्देश बनारसच्या पवित्र भूमीवर त्यांच्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेणं आणि इथंच त्यांचं जीवन अर्पण करणं आहे. अनेक लोक त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यापूर्वीच मृत्युमुखी पडतात. अशा परिस्थितीत, त्यांची राख गंगेत विसर्जित केली जाते. तथापि, आता बनारसमध्ये अशी अनेक हॉटेल्स उघडली गेली आहेत, जिथं लोक राहतात आणि त्यांच्या मृत्यूची वाट पाहतात.
advertisement
Shocking! बायकोचं ऐकला नाही, नवऱ्याचा मृत्यू! काही तासातच गेला जीव
सोशल मीडियावर एका व्यक्तीने या मृत्यूच्या हॉटेल्सची झलक दाखवली. या हॉटेल्समध्ये खूप आजारी असलेले लोक येतात. ज्यांना कळतं की त्यांच्याकडे जास्त वेळ उरलेला नाही. अशा परिस्थितीत, बनारसमध्ये त्यांचे शेवटचे श्वास मोजण्यासाठी, ते या मृत्यूच्या हॉटेल्समध्ये राहतात. ते इथे खोल्या भाड्याने घेतात आणि तिथेच राहू लागतात जेणेकरून ते इथेच मरतील आणि थेट स्वर्गाच्या दाराशी पोहोचू शकतील.
त्या व्यक्तीने बनारसमधील अशाच एका हॉटेलच्या मालकाशीही बोलले जे अशा सुविधा पुरवते . त्यांनी सांगितलं की आजारी लोक मृत्यूची वाट पाहण्यासाठी बनारसमधील त्यांच्या हॉटेलमध्ये खोल्या घेतात. येथे येणारे बहुतेक लोक असे रुग्ण असतात, ज्यांच्यापुढे डॉक्टर आधीच हार मानतात. हे लोक फक्त वीस रुपयांना दररोज हॉटेलमध्ये राहू शकतात. बरेच लोक येथे दोन महिने त्यांच्या मृत्यूची वाट पाहत राहतात. गेल्या काही काळापासून, या परिसरात या डेथ हॉटेल्सची संख्या वाढली आहे. अशी अनोखी हॉटेल्स देखील अस्तित्वात आहेत हे जाणून लोकांना आश्चर्य वाटते.