सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोक हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला जात आहेत. त्यामुळे तेथे खूप गर्दी आहे. अशातच काही लोक हिमाचलच्या अटल टनेल रोडवर स्टंट करताना दिसत आहे. गर्दीमध्ये रस्त्यांवर कारचे दोन्ही दरवाजे उघडे ठेवून बाहेर निघत हुल्लडबाजी करताना दिसतायेत. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
समोक आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रॅफिक जॅममध्ये अटल बोगद्यावर वाहनांचू गर्दी आहे. अशातच एका व्यक्तीनं आपल्या कारचे दोन्ही दरवाजे उघडले आणि दोन लोक दोन्ही दरवाजांना लटकताना दिसले. एवढ्या गर्दीतही ते स्टंटबाजी करत होते. सुदैवाची उघडे दरवाजे दुसऱ्या गाडींला धडकले नाही, नाहीतर अपघात झाला असता.
advertisement
@shubhamtorres09 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 7 सेकंदाचा हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. थोडीशीही चूक झाली असती तर अपघात घडला असता. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी अशी स्टंटबाजी करणं चुकीचं असून या कारमधील तरुण आनंदाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करताना दिसले. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून नेटकऱ्यांनी या कृतीविषयी संताप व्यक्त केलाय.