ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेल्या मदर इलिश संवर्धन ऑपरेशनअंतर्गत एका माशासाठी 17 युद्धनौका, गस्ती नौका आणि आधुनिक सागरी विमाने तैनात करण्यात आली आहेत. संपूर्ण नौदल आणि हेलिकॉप्टर सध्या त्याच्या संरक्षणात गुंतले आहेत. 4 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या तीन आठवड्यांसाठी मासेमारीवर सक्त बंदी आहे. विशेषतः बांगलादेशच्या चांदपूर, बारिशाल आणि खुलना यासह नऊ किनारी आणि नदीकाठच्या भागात.
advertisement
कोणता आहे हा मासा?
हा मासा आहे हिलसा, जो बांगलादेशचं राष्ट्रीय प्रतीक आहे. सांस्कृतिकदृष्ट्या हिल्सा बांगलादेशी उत्सवांचा एक भाग आहे. जसं की पोहेला बैशाख (नवीन वर्ष) दरम्यान इलिश भात खाणं. एक चांदीसारखा, चमकदार मासा आहे ज्याची चव इतकी स्वादिष्ट आहे की लोक त्याला समुद्राची राणी म्हणतात. दरवर्षी बंगालच्या उपसागरातून नद्यांमध्ये अंडी घालण्यासाठी परतणारा हा मासा पश्चिम बंगाल, भारतातील देखील अत्यंत लोकप्रिय आहे. खरं तर या माशाचं भारताशीही विशेष नातं आहे.
या माशाला संरक्षण का?
हवामान बदल, समुद्राची वाढती पातळी आणि जास्त मासेमारीमुळे त्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार, जागतिक हिलसा उत्पादनापैकी 70% पेक्षा जास्त उत्पादन बांगलादेशातून येतं, परंतु शिकारीमुळे त्याचा साठा 30% ने कमी झाला आहे.
Fish Cleaning : तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करताय फिश; एक्सपर्टनी सांगितलं मासे कसे साफ करायचे
त्याच्या अंडी हंगामात (ऑक्टोबर) ते सर्वात असुरक्षित असतात, म्हणून सरकारने ते वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर हे केलं नाही तर पुढील 10 वर्षांत हिल्साची लोकसंख्या निम्मी होऊ शकते, जी पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धक्का असेल.
युरेशियन टाईम्सच्या वृत्तानुसार, बांगलादेश लष्कराच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने म्हटलं आहे की, "देशी आणि परदेशी मच्छिमारांना समुद्रात घुसखोरी रोखण्यासाठी युद्धनौका आणि अत्याधुनिक सागरी गस्त विमाने चोवीस तास देखरेख करत आहेत." ऑपरेशनच्या पहिल्या आठवड्यात डझनभर बेकायदेशीर बोटी जप्त करण्यात आल्या आहेत आणि नौदलाने ड्रोनचा वापर देखील सुरू केला आहे.
मच्छिमारांना 25 किलो तांदूळ
ढाक्यामध्ये त्याची किंमत प्रति किलो 2200 टाका सुमारे 1600 रुपयेपर्यंत पोहोचते. 2025 मध्ये निर्यातीतून देशाला 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं. आर्थिकदृष्ट्या ते लाखो मच्छिमारांच्या उपजीविकेला आधार देतं.
Fish : माशातील सगळ्यात पौष्टीक भाग कोणता?
60 वर्षीय मच्छीमार सत्तार माझी यांच्या आवाजातून वेदना दिसून येतात. "हे तीन आठवडे मच्छिमारांसाठी खूप कठीण आहेत, कारण आमच्याकडे जगण्याचे दुसरं कोणतंही साधन नाही." सरकारने प्रत्येक मासेमार कुटुंबाला भरपाई म्हणून 25 किलो तांदूळ दिला आहे, परंतु अनेकांना हे अपुरं वाटतं.
जगातील अनोखी मोहीम
एखादा देश आपल्या माशांच्या संरक्षणासाठी युद्धनौका तैनात करतो हे विचित्र वाटेल, पण ही मोहीम केवळ हिल्साच्या संरक्षणाबद्दल नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्याबद्दल देखील आहे. लष्करी जहाजांच्या उपस्थितीमुळे अंडी उगवणाऱ्या हिल्साला त्रास होऊ शकतो अशी तज्ज्ञांची चिंता आहे, परंतु सरकारचा असा युक्तिवाद आहे की शिकार थांबवणं आवश्यक आहे. बांगलादेशने 2025 च्या हवामान शिखर परिषदेत हिल्साला हवामान-संवेदनशील प्रजाती म्हणून घोषित करून आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे आणि ही मोहीम त्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. ही केवळ मासेमारीवर बंदी घालण्याची मोहीम नाही तर हिल्साचा सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक महत्त्व जपण्यासाठीच्या संघर्षाचे प्रतिबिंबित करणारे राष्ट्रीय अभियान आहे. जर ही मोहीम यशस्वी झाली तर 2026 मध्ये हिल्साचे उत्पादन 20% वाढू शकते.