Fish Cleaning : तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करताय फिश; एक्सपर्टनी सांगितलं मासे कसे साफ करायचे
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Clean Fish : मासे स्वच्छ करायचे म्हटलं की बहुतेक जण खवले, पंख शेपटी, असे भाग काढून टाकले आणि ते पाण्यात धुतले की झाले स्वच्छ, असं अनेकांचं असतं. पण मासा स्वच्छ करायची एक विशिष्ट पद्धत आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : मासे म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मासे अनेकांना खायला आवडतात पण ते स्वच्छ करायचं म्हटलं की अनेकांच्या डोक्यावर आट्या येतील. मासे स्वच्छ करायचे म्हटलं की बहुतेक जण खवले, पंख शेपटी, असे भाग काढून टाकले आणि ते पाण्यात धुतले की झाले स्वच्छ, असं अनेकांचं असतं. पण मासा स्वच्छ करायची एक विशिष्ट पद्धत आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
मासे असो वा कोणतंही नॉनव्हेज ते नीट स्वच्छ करायचं कारण ते मांस असतं. माशाच्या आत ब्लड क्लॉट्स असतात, वेस्ट पार्ट असतात. ते स्वच्छ झाले नाही तर खाताना तोंडाला कडवट किंवा वेगळी चव लागते.
काही मासे जसे की गोड्या पाण्यातील आंबळ्यासारखे मासे नदीत खूप खाली पोहोतात, त्यांच्यात माती असते, ती नीट साफ करावी. तसंच त्याच्यात एक फुगा असतो, ती पित्ताची पिशवी असते ती काढावी लागते नाहीतर आरोग्याला हानिकारक ठरू शकते. कोळंबीच्या आत धागा असतो, ती कोळंबीची नस असते. हा धागा काढायचा नाहीतर तो थोड्या प्रमाणात विषारी ठरू शकतो आणि पोटाला त्रास देईल.
advertisement
प्रत्येक मासे साफ करायची पद्धत वेगवेगळी असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मासा कोणताही असतो तो वाहत्या पाण्यात स्वच्छ करायचा. पाणी साठवून त्यात मासे धुवून घेऊ नये, असा सल्ला शेफ तुषार वैद्य यांनी एका पॉडकास्टवर बोलताना दिला आहे.
advertisement
माशातील पौष्टीक भाग
मासे आणल्यानंतर आपण ते आणतो स्वच्छ करतो, त्याचे काही भाग काढतो, स्वच्छ धुवून मग ते शिजवतो. मासे स्वच्छ करताना माशाचे काही भाग आपण अनावश्यक म्हणून काढून टाकतो. पण माशामधील असे काही भाग जे पौष्टीक असल्याचं सांगितलं जातं, पण आपण सगळे ते फेकून देतो. हे भाग कोणते ते पाहुयात.
advertisement
माशाचा डोळा : बहुतेक लोक माशाचा डोळा फेकून देतात. काही लोक खातातही यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होतं असं म्हणतात. पण माहितीनुसार माशाच्या डोळ्यात व्हिटॅमिन बी 1, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता वाढते. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यात मदत होते.
माशाचं ब्लॅडर : पारंपारिक प्राचीन औषधांमध्ये माशाच्या ब्लॅडरला खूप महत्त्वं आहे. यात जिलेटिन, लिपिड, शुगर आणि व्हिटॅमिन असे घटक असतात. पारंपारिक मेडिसीनुसार फिश ब्लॅडर रक्त चांगलं, किडनी मजबूत ठेवतं. गुडघ्याचे सांधे आणि कमरेसाठी चांगलं. नव्या संशोधनानुसार फिश ब्लॅडरमध्ये कोलेजन असतं जे मानवी टिश्यु सेल्स सुधारतं आणि त्वचा वृद्ध होण्याची प्रक्रिया मंदावते.
advertisement
फिश बोन : फिश बोन म्हणजे माशाचे काटे. सामान्यपणे आपण सगळेच हे फेकून देतो. पण यात कॅल्शिअम असतं, जे ऑस्थोपोरोसिस रुग्णांसाठी गरजचं असतं. काटे नरम होईपर्यत मासे शिजवा. किंवा तुम्ही ते सुकवून त्याची पावडर करून ते आहारात घ्या. किंवा तुम्ही याचं सुप बनवून पिऊ शकता.
advertisement
फिश लिव्हर : फिश लिव्हरमध्ये भरपूर प्रोटिन आणि अनसॅच्युरेडेट फॅट असतं जे आरोग्यासाठी चांगलं असतं. यातील कोलेस्ट्रॉलही चांगलं असतं. याची चवही चांगली असते.
फिश ब्रेन : माशाच्या मेंदूच फिश ऑईल असतं जे मानवी शरीरासाठी आवश्यक आहे. फिश ऑईलमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतं. जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी गरजेचं असतं, तसंच वृद्धापकाळात अल्झामरसारख्या आजारापासून बचाव करतं.
advertisement
माशाची खवलं : मासे घेतल्यानंतर ते स्वच्छ करताना त्यावरील खवलं सगळ्यात आधी काढून टाकली जातात. पण यात प्रोटिन, फॅटी अॅशिड, कोलिन, लेसिथीन इत्यादी घटक असतात. लेसिथीन स्मरणशक्ती वाढण्यात आणि एजिंग प्रोसेस मंदावण्यात मदत करतं. फॅटी अॅशिड रक्तातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं.
आता माशाची खवलं खायची कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, द बस्टेडन्यूज या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एका भांड्यात पाणी घ्या ते उकळा, त्यात थोडं व्हिनेगर टाका आणि माशाची खवलं टाकून उकळून घ्या. या पाण्याला सूपसारखं स्ट्रक्चर येईपर्यंत तुम्ही ते उकळा. यात तुम्हाला हवे असलेले मसाले टाका आणि प्या.
Location :
Delhi
First Published :
October 06, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fish Cleaning : तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करताय फिश; एक्सपर्टनी सांगितलं मासे कसे साफ करायचे