Cancer : कॅन्सरमुळे गेलेले केस परत येतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं उपचारानंतर काय होतं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cancer Hair Loss : कॅन्सर झालेल्या लोकांमध्ये तुम्ही एक पाहिलं असेल की त्यांचे केस जातात. पण हे केस परत येतात का? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल.
नवी दिल्ली : कॅन्सर म्हटलं की धडकीच भरते. इतर कोणत्याही आजारापेक्षा हा आजार मोठा वाटतो. अगदी सेलिब्रिटींना कॅन्सर झाल्याची कितीतरी प्रकरणं तुम्ही पाहिलं असतील. काही सेलिब्रिटींनी कॅन्सरला हरवलं तर काही कॅन्सरशी लढा हरले आणि त्यांचा मृत्यू झाला. कॅन्सर झालेल्या लोकांमध्ये तुम्ही एक पाहिलं असेल की त्यांचे केस जातात. पण हे केस परत येतात का? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल.
कॅन्सर रुग्णांचे केस गेलेले तुम्ही पाहिले असतील. ज्या सेलिब्रिटींना कॅन्सर झाला त्यांनी कॅन्सरच्या उपचारावेळी टक्कल झाल्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेत. पण नंतर तुम्ही याच सेलिब्रिटींच्या डोक्यावर केस पाहिले असतील. त्या विग लावतात असं आपल्याला वाटतं. पण कॅन्सरमुळे गेलेले केस कायमचे जातात? नंतर आयुष्यभर विग लावावी लागते, की खरे केस परत येतात असा प्रश्न उपस्थित होतो.
advertisement
कॅन्सरमुळे गेलेले केस परत येतात का? याआधी ते का जातात यामागील नेमकं कारण जाणून घेऊया. कॅन्सर रुग्णांचं केस जाण्याचं कारण म्हणजे कॅन्सरच्या उपचारात असलेली किमोथेरेपी. ही कॅन्सरवरील एक उपचार प्रक्रिया आहे त्यादरम्यान रुग्णांच्या डोक्यावरचे केस गळायला लागतात. किमोथेरेपीमध्ये रेडिएशनमुळे कॅन्सर रुग्णांचे केस खूप जास्त गळायला लागतात. सगळ्या किमोथेरेपी दरम्यान केस गळत नसले तरी ब्रेस्ट कॅन्सर दरम्यान तर हमखास रुग्णांचे केस गळतात.
advertisement
आता हे गेलेले केस परत येतात का? तर याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं की, आमच्या डोळ्यासमोर असलेले रुग्ण ज्यांचे केस गेलेले आहेत. त्यांचं आम्ही काऊन्सिलिंग करतो. त्यांना सांगतो की काळजी करू नका, तुमचे केस येतील परत. सर्जरी किंवा ट्रिटमेंट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते आमच्याकडे फॉलोअपसाठी येतात तेव्हा त्यांचे केस आलेले असतात. आणि ते आम्हाला सांगतात आधी आम्हाला वाईट वाटत होतं, पण आता आम्ही त्यातून बाहेर येत आहोत. तुम्ही म्हणाला होतात ते खरं होतं.
advertisement
आता लोकांचे केस बऱ्याच कमी प्रमाणात जातात. कारण आता जे नवीन ड्रग्ज आले आहेत त्यात टॉक्सिसिटी कमी असते आणि काही ड्रग्ज, औषधं किंवा मेडिसीनमुळे केस जरी गेले तरी दोन ते तीन महिन्यांत सगळे केस पुन्हा येतात, अशी माहिती पुण्यातील कॅन्सर सर्जन डॉ. मिहिर चितळे यांनी एका पॉडकास्टवर दिली.
Location :
Delhi
First Published :
October 04, 2025 1:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : कॅन्सरमुळे गेलेले केस परत येतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं उपचारानंतर काय होतं