Cough Syrup : कफ सिरफ नाही मग खोकला झाल्यावर मुलांना काय द्यायचं? डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cough Syrup : कफ सिरफमुळे मुलांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर येत आहेत. सरकारनेही लहान मुलांना कफ सिरफ देण्यावर बंदी घातली आहे. मग आता मुलांना खोकला झाला तर नेमकं काय करायचं? असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाला आहे. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : खोकला झाला की आपण सहजपणे कफ सिरफ घेतो, अगदी लहान मुलांनाही कफ सिरफ देतो. पण गेल्या काही दिवसात कफ सिरफमुळे मुलांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. सरकारनेही लहान मुलांना कफ सिरफ देण्यावर बंदी घातली आहे. मग आता मुलांना खोकला झाला तर नेमकं काय करायचं? असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाला आहे. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
मुलांना कफ सिरफ द्यायचं नाही मग त्याऐवजी काय द्यायचं? याबाबत बालरोगतज्ज्ञांनी माहिती दिली आहे. त्यांनी लहान मुलांच्या खोकल्यावर एक घरगुती उपाय सांगतला आहे. ज्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
व्हिडीओत दाखवल्यानुसार अर्धा चमचा संत्रं घ्यायचं वरून गोलाकार कापा. मोठ्या गोलाकार भागात काटा चमचा टाकून टोचून घ्या. त्यावर मीठ टाका, त्याचा वरचा भाग लावून मायक्रोव्हेवमध्ये गरम करून घ्या. नंतर बाहेर काढून वरचा भाग काढून त्यावर मध टाका आता हे संत्र एका भांड्यात पिळून घ्या. हा रस तुमच्या मुलांना द्या. पण हे कफ सिरफ एक वर्षावरील मुलालाचं द्यायचं आहे. एक वर्षाखालील मुलंना मध देऊ नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
advertisement
बालरोगतज्ज्ञ डॉ. जिनल गाडा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कफ सिरफचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
कफ सिरफबाबत सरकारच्या सूचना
2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत.
5 वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
advertisement
कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आधार देणारे उपाय यांचा समावेश आहे.
औषधोपचार आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आणि जवळच्या देखरेखीखाली औषधं द्यावीत.
डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस आणि उपचाराच्या कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. एकाच वेळी अनेक औषधे मिसळून देणे टाळावे, असेही निर्देश आहेत.
advertisement
(सूचना : या लेखाचा काही भाग सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)
Location :
Delhi
First Published :
October 04, 2025 9:42 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cough Syrup : कफ सिरफ नाही मग खोकला झाल्यावर मुलांना काय द्यायचं? डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय