डेंग्यू तापामुळे प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते, जी रक्त गोठते. ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. काही अभ्यासांनी असं सुचवलं आहे की पपईच्या पानांचा अर्क प्लेटलेट पातळी वाढवण्यास मदत करू शकतो. पपईची पानं जीवाणू आणि संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी आहेत.
पपईच्या पानांमध्ये पॅपेन, एंजाइम, व्हिटॅमिन ए, सी आणि ई आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स सारखी विविध घटकांचा समावेश असतो. पपईच्या पानांमधील ही जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक वाढविण्यात मदत करतात.
advertisement
Viral remedies fact : जेवणानंतर तोंडात लवंग ठेवल्याने अॅसिडीटी होत नाही?
मुंबईच्या झायनोव्हा शाल्बी रुग्णालय आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितलं, पपईच्या पानांच्या अर्काचे अनेक फायदे आहेत जे प्लेटलेटची संख्या वाढवू शकतात, ज्यामुळे डेंग्यू तापावर हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. डेंग्यू तापावर नियंत्रण ठेवण्यासाठी पपईची पानं मदत करतात. या पानांचा रस शरीराची डेंग्यू विषाणूशी लढण्याची क्षमता वाढवतात.
पपईच्या पानांमधील एन्झाईम्स आणि अँटिऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात, जे डेंग्यूची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी फायदेशीर आहे. पपईच्या पानांमधील उच्च अँटिऑक्सिडेंट सामग्री ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करते , संभाव्यतः पेशी आणि ऊतींचे नुकसान कमी करते. पपईच्या पानांमध्ये पपेन असते, जे पचनास मदत करते आणि डेंग्यू तापासोबत काही वेळा पचन समस्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. पपई आपल्या शरीरात प्रथिने पचवण्यात मदत करतो, ज्यामुळे अन्न चांगले पचते.
Viral Remedies Fact : उपाशीपोटी मनुक्याचं पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स गायब होतात?
पपईच्या पानांचा रस कसा कराल?
1. पपईची 4-5 ताजी पाने घ्या आणि ती स्वच्छ धुवा.
2. या पानांचे लहान तुकडे करा त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळा
3. त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या रसामध्ये पाणी थोडे जास्त टाका. यामुळे कडूपणा कमी होण्यास मदत होईल.
4. रस हा ताजा आणि शक्यतो रिकाम्या पोटी प्या. एकदाच रस तयार करून ठेऊ नका.
