Viral Remedies Fact : उपाशीपोटी मनुक्याचं पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स गायब होतात?

Last Updated:

पिंपल्सवरील एक उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, तो म्हणजे मणुक्याचं पाणी. दररोज सकाळी उपाशीपोटी मणुक्याचं पाणी प्यायल्याने पिंपल्स गायब होतात असा दावा या पोस्टमध्ये केला जातो आहे. असं खरंच शक्य आहे, हे न्यूज18मराठीने तज्ज्ञांनीकडून जाणून घेतलं आहे.

प्रतीकात्मक फोटो (AI)
प्रतीकात्मक फोटो (AI)
नवी दिल्ली : चेहऱ्यावर पिंपल्स आले की ते हटवण्यासाठी काय काय उपाय केले जात नाहीत. बरेच लोक यावर घरगुती उपाय करतात. याच पिंपल्सवरील एक उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, तो म्हणजे मणुक्याचं पाणी. दररोज सकाळी उपाशीपोटी मणुक्याचं पाणी प्यायल्याने पिंपल्स गायब होतात असा दावा या पोस्टमध्ये केला जातो आहे. असं खरंच शक्य आहे, हे न्यूज18मराठीने तज्ज्ञांनीकडून जाणून घेतलं आहे.
मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मनुका अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. 100 ग्रॅम मनुक्यांमध्ये 300 कॅलरीज, 749 पोटॅशियम, 79 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 3.1 ग्रॅम प्रोटीन असतं. मनुक्यांमध्ये 3 टक्के व्हिटॅमिन सी, 10 टक्के लोह, 8 टक्के मॅग्नेशियम आणि 10 टक्के व्हिटॅमिन बी सुद्धा आढळून येतं. एका दिवसात 4 ते 6 मनुके खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
मनुका त्वचेसाठी फायदेशीर?
मनुका पाण्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक असतात. मनुक्याचे पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरास बर्‍याच फायद्यांसह ऊर्जा देखील मिळते. मनुक्याचं पाणी प्यायल्याने त्यातील पोषणमूल्य आपल्या शरीराला मिळतात.
मनुके भिजवलेले पाणी त्वचेसाठी खूप चांगलं आहे. हे पाणी केवळ शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी काम करत नाही. हे तुमच्या त्वचेला पोषण देण्याचं काम करतात.
advertisement
मनुक्याचे पाणी जसे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तसंच त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यात देखील त्याचा मोठा वाटा असतो. दररोज मनुक्याचं पाणी पिणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मनुका लोहाने समृद्ध असून आपल्या शरीरात रक्त वाढवण्यात मदत करते. शक्यतो मनुके खाण्याआधी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावे, थोडे हलके फुगल्यावर त्यांचं सेवन करावं.
मनुक्याचं पाणी प्यायल्याने पिंपल्स गायब होतात?
मुंबईतील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितलं की मनुक्यात लायकोपेन असतं, जे अँटिऑक्सिडंट आहे. यामुळे मनुक्याचं पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरी पिंपल्स जाण्यास मदत होते.
advertisement
कसं तयार कराल मनुक्याचं पाणी
यासाठी दोन कप पाणी आणि 150 ग्रॅम मनुका घ्या. एका भांड्यात पाणी उकळा. पाणी पूर्णपणे उकळल्यावर त्यात मनुका टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. नंतर सकाळी पाणी मोठ्या आचेवर तापवा. हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. परंतु, हे लक्षात ठेवा की हे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका.
advertisement
या लोकांनी पिऊ नये मनुक्याचं पाणी
जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक असेल तर अशा रुग्णांनी मनुक्याचं सेवन करणं टाळावं. मनुक्यांमध्ये उच्च ग्लाइसेमिक घटक असतात, यामुळेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. प्रमाणापेक्षा अधिक मनुक्यांचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते, असा सल्ला मुंबईतील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Remedies Fact : उपाशीपोटी मनुक्याचं पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स गायब होतात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement