Viral remedies fact : जेवणानंतर तोंडात लवंग ठेवल्याने अॅसिडीटी होत नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
जेवणानंतर लवंग तोंडात ठेवून चघळल्याने अॅसिडीटी होत नाही, असा दावा या व्हिडीओमध्ये केला जात आहे. खरंच असं होतं का? हा उपाय किती प्रभावी आहे? याबाबत न्यूज18मराठीने तज्ज्ञांकडून जाणून घेतलं आहे.
नवी दिल्ली : काहीही खाल्ल्यानंतर अनेकांच्या छातीत जळजळ होते, अॅसिडीटीची समस्या कित्येकांना असते. यावर उपाय म्हणून एक घरगुती उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जेवणानंतर लवंग तोंडात ठेवून चघळल्याने अॅसिडीटी होत नाही, असा दावा या व्हिडीओमध्ये केला जात आहे. खरंच असं होतं का? हा उपाय किती प्रभावी आहे? याबाबत न्यूज18मराठीने तज्ज्ञांकडून जाणून घेतलं आहे.
मसाल्यांमधील लवंग प्रत्येकाच्या घरात सहजपणे उपलब्ध असते. ही औषधी आणि महत्त्वपूर्ण घटकांनी भरलेली असून आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लवंगमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त यांसारखी खनिजं भरपूर प्रमाणात असतात.
लवंग खाण्याचे फायदे
लवंगात जंतुनाशक, विषाणूनाशक देखील आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. लवंगमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. फायबर पचनास मदत करते. हे शरीरातील चयापचय गतिमान करण्यास मदत करते. यामुळे ज्यांना आपलं वाढलेलं वजन कमी करायचं आहे. त्यांनी तर आहारामध्ये लवंग घ्यायलाच हवी. दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंगा कोमट पाण्यासोबत घेणं, ही लवंग खाण्याची उत्तम पद्धत आहे, असं मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील डायटिशियन फौजिया अन्सारी यांनी सांगितलं.
advertisement
अतिसेवन हानिकारक
कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकतं. त्याचप्रमाणे लवंगाचं जास्त प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायकच आहे. लवंगमध्ये युजेनॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात लवंगाचं सेवन केल्यास रक्तस्त्राव किंवा आतड्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो. मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कारण ती उच्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.
advertisement
पचनाच्या समस्या दूर होतात
लवंगाचं सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. लवंगमध्ये फायबरचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया आणि त्याच्याशी संबंधित इतर त्रास कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे पचनाला मदत होते. तसंच बद्धकोष्ठता, गॅस आणि वजन कमी करण्यासाठी देखील लवंग उत्तम मानली जाते. लवंग खाल्यामुळे पचन क्रियेमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या एन्झाईम्सची निर्मिती योग्य प्रमाणात होते.
advertisement
advertisement
दररोज योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणात लवंग खाल्ली तर त्यामुळे पचनाशी संबंधित वेगवेगळे त्रास तर कमी होतातच. पण शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. लवंगाच्या सेवनाने भूक वाढवण्यासोबतच पोटातील जंतांच्या समस्येपासूनही आराम मिळतो. हे शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
September 29, 2024 8:46 AM IST


