विमानात महिलेनं जे कृत्य केलं ते पाहून सगळेच प्रवासी चकित झाले. ते लगेच महिलेच्या त्या कृत्याचा फोटो काढायला लागले. महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
रक्तरंजित लढाई, समुद्रातच होतो हा भयावह खेळ; ज्यामध्ये अनेकांचा जातो जीव
महिला विमानात विचित्र गोष्टी करु लागली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला सामान ठेवतात त्या ठिकाणी जाऊन झोपली. ओवरहेड लगेज ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर ती जाऊन बसल्यामुळे इतर प्रवासी थक्क झाले. ही नेमकी काय करतेय म्हणून काहीजण घाबरले. अनेकांनी तिचा काढलेला फोटो इंटरनेटवर सध्या खळबळ उडवत आहे.
advertisement
दरम्यान, फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही हे प्रकरण नेमकं काय होतं हे स्पष्ट झालं नाही. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र लोकांच्या कमेंटचा पाऊस पहायला मिळाला. लोकांनी मजा घेत कमेंट केल्या. अशा बऱ्याच घटना विमानात पहायला मिळतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठिण होतं. अनेकदा लोकांना आपण कुठे काय करतोय याचंही भान राहत नाही.