TRENDING:

स्कायडायव्हिंगचा थरार जीवावर बेतला? हवेत असतानाच तरुणाचा हार्ट अटॅक, थरारक Video Viral

Last Updated:

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक हृदयद्रावक घटना दाखवण्यात आली आहे, जी तुम्हाला असा साहसी प्रकार करण्यापूर्वी विचार करायला भाग पाडेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही मनोरंजक तर काही थारारक असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

हल्ली लोकांना साहसी गोष्टी करायला फार आवडतात. त्यामध्ये स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग सारख्या गोष्टी खूपच पॉप्युलर झाल्या आहेत. यासंबंधीत फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील.

असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक हृदयद्रावक घटना दाखवण्यात आली आहे, जी तुम्हाला असा साहसी प्रकार करण्यापूर्वी विचार करायला भाग पाडेल. स्कायडायव्हिंग करताना एका स्कायडायव्हरला हृदयाचा झटका आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

advertisement

व्हिडिओमध्ये स्कायडायव्हर बेशुद्ध अवस्थेत अनियंत्रितपणे खाली पडताना दिसत आहे. मात्र, या स्कायडायव्हरचा साथीदार आणि ट्रेनर लगेच त्याच्या मदतीसाठी पोहोचतो. ट्रेनरने अत्यंत सावधगिरीने स्कायडायव्हरला वाचवले आणि स्थिर लँडिंग देखील केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, हा व्हायरल व्हिडिओ 2015 सालचा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा स्कायडायव्हर क्रिस्टोफर जोन्स असे असून तो ऑस्ट्रेलियातील पर्थचा रहिवासी आहे. क्रिस्टोफर जोन्स हा स्कायडायव्हिंग करत होता तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला. काही वेळातच त्याचा ट्रेनर शेल्डन मॅकफार्लेननेही त्याला वाचवण्यासाठी उडी घेतली. मॅकफार्लेनने जोन्सला सुमारे 4,000 फुटांवर पकडले आणि रिप कॉर्ड ओढली. मॅकफार्लेनच्या अनेक प्रयत्नांनंतर, जोन्स पुन्हा शुद्धीवर आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पवना नदीचं आरोग्य धोक्यात, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास, कारण काय?
सर्व पहा

यानंतर त्याचे सॉफ्ट लँडिंग झाले. ही संपूर्ण घटना ट्रेनर शेल्डन मॅकफार्लेनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मराठी बातम्या/Viral/
स्कायडायव्हिंगचा थरार जीवावर बेतला? हवेत असतानाच तरुणाचा हार्ट अटॅक, थरारक Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल