आता एका व्यक्तीने भोलेनाथ यांना अजब पत्र लिहिलं आहे. त्या व्यक्तीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानी आपली समस्या भोलेनाथ यांना पत्रात सांगितली. लग्न होत नसल्यानं हा तरुण नाराज आहे. अनेक प्रयत्न करूनही तरुणाचं लग्न होत नव्हतं. या कारणास्तव तरुणाने आपली तक्रार भोलेनाथ यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपली समस्या एका पत्रात लिहून भोलेनाथ यांना पोस्टाने पाठवली. मात्र, आता त्याचं पत्र वाचून लोक हसू लागले.
advertisement
लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाचं नको ते कृत्य; नवरीला फुटला घाम, धावतच माहेरी पोहोचली अन्..
पत्रात त्या व्यक्तीने भोलेनाथ यांच्याकडे आपलं लग्न करण्याची विनंती केली होती. पत्रात तरुणाने लिहिलं की, अनेक प्रयत्न करूनही त्याला लग्नासाठी मुलगी सापडली नाही. ना त्याचं लव्ह मॅरेज होत आहे ना अरेंज मॅरेज. अशा स्थितीत त्यानी शेवटच्या आशेनं भोलेनाथांना पत्र लिहिलं. तरुणाने भोलेनाथ यांना विनंती केली, की एखाद्या मुलीने माझ्याशी लग्न करू द्या. लिंकवर क्लिक करून पाहा पत्र.
या तरुणाने आपल्या पत्रात पुढे लिहिलं की, जर त्याला श्रावण महिन्यात ही मुलगी सापडली तर तो भोलेनाथ यांना भांगची दोन पोती अर्पण करेल. याशिवाय तरुणाने एक किलो गांजा अर्पण करणार असल्याचंही सांगितलं. हे पत्र वाचताच लोक हसू लागले. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे या पत्राचा पत्ता. तरुणाने हे पत्र कैलास पर्वतावर पोस्ट केलं होतं. हे पत्र लोकांमध्ये चांगलंच व्हायरल होत आहे.
