इन्स्टाग्राम युझर नतालिसी (@natalisi_taksisi) ही थायलंडची सोलो ट्रॅव्हलर आहे जिने अलीकडेच जपानला भेट दिली. तिच्यासोबत एक घटना घडली ज्यामुळे ती खूप घाबरली. तिने एक व्हिडिओ बनवला आणि घटनेबद्दल सांगितलं. तिने सांगितले की ती 3 दिवसांसाठी एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेली होती. हॉटेलच्या बेडखालून एक विचित्र आवाज येत असताना तिने एक नजर टाकली. जेव्हा तिला खाली दोन डोळे दिसले तेव्हा ती खूप घाबरली आणि ओरडू लागली.
advertisement
वडीलांचा मृतदेह दोन वर्षं कपाटात ठेवला आणि… मुलाच्या कृत्यामागचं सत्य मन हेलावून टाकणारं
तिच्या बेडखाली एक अज्ञात व्यक्ती होती. काही क्षण तो नतालीकडे पाहू लागला. त्यानंतर तोही ओरडू लागला आणि तिथून पळून गेला.
ताबडतोब पोलिसांना बोलावण्यात आलं. ती व्यक्ती कोण होती आणि ती तिथं कशी आली याचं उत्तर हॉटेल कर्मचाऱ्यांकडे नव्हतं. सीसीटीव्ही कॅमेरेही खराब होते. हॉटेलमध्ये कार्ड सिस्टीम होती, त्यामुळे कार्डशिवाय ती व्यक्ती खोलीत कशी आली याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.
खूप प्रयत्नांनंतर, महिलेला हॉटेलकडून पूर्ण पैसे परत मिळाले आणि ती दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट झाली, परंतु तिची भीती तशीच राहिली.
अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की अशा हॉटेल्सवर बंदी घालावी, तर दुसऱ्याने म्हटलं की ही कहाणी ऐकल्यानंतर तो घाबरला आहे.