अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या एका एस्ट्रॉनटने पृथ्वीचा जवळून व्हिडीओ शेअर केलाय. स्पेस सेंटरमधून पृथ्वी कशी दिसते याचं एक मनमोहक दृश्य समोर आलं असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड वेगानं व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये पृथ्वीचा वरचा भाग अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. पृथ्वी ढगांनी वेढलेली दिसत आहे. अंतराळ स्थानकाच्या आतून हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोक याला एक अद्भुत दृश्य म्हणतायेत. @wonderofscience नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांचं हे दृश्य डोळ्यांसाठी एका मेजवाणीपेक्षा कमी नाही. स्पेस स्टेशनमधून एका एस्ट्रॉनटनं हा नजारा कॅमेऱ्यात कैद केला आहे.
advertisement
दरम्यान, लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. याशिवाय व्हिडीओ अनेकवेळा शेअर केला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2024 7:53 AM IST
