जर ऑक्सिजन दुप्पट झाला तर काय होईल?
जर पृथ्वीवरून काही सेकंदांसाठी ऑक्सिजन काढून टाकल्यास, पृथ्वीवर हाहाकार माजेल. मोठ्या इमारती काही सेकंदात कोसळतील आणि वाहने जिथे असतील तिथेच थांबतील. मानव आणि प्राणी मरू लागतील. मात्र, ऑक्सिजन वाढल्यानंतर याच्या अगदी उलट होईल. पृथ्वीवरील प्राण्यांचे आकार अनेक पटींनी वाढेल. लहान कीटकसुद्धा तुम्हाला मोठे दिसू लागतील. कोळी उंदराएवढे आणि उंदीर सशाएवढे होतील. पृथ्वीवरील झाडे इतकी मोठी होतील की ती ढगांना स्पर्श करू लागतील.
advertisement
मानवांवर याचा काय परिणाम होईल?
जर आपण मानवांवर होणाऱ्या परिणामाबद्दल बोललो, तर माणसे त्यांच्या आकारापेक्षा 2 मीटर उंच होतील. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या मार्वल कॉमिक्सच्या चित्रपटातील हल्कसारखे दिसू लागतील. यामुळे मानव सुपरमॅन होणार नाहीत, पण त्यांचा आकार पूर्वीपेक्षा मोठा होईल. मानवी शरीरात आढळणाऱ्या न्यूट्रोफिल्सची धोकादायक विषाणू आणि जीवाणूंशी लढण्याची क्षमता वाढेल.
रस्त्यावर पेट्रोल आणि डिझेलवर धावणारी वाहने पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावू लागतील. कागदी विमाने लांबवर उडतील. या सगळ्यासोबत अनेक धोकेही असतील. जसे की, आग खूप मोठी लागेल आणि ती विझवण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागेल. मानव आणि प्राण्यांमध्ये जास्त ऑक्सिजनमुळे सुरुवातीला श्वास घेणे सोपे होईल, पण कालांतराने ऑक्सिजन विषारी ठरू शकतो. ते फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकते आणि मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे चक्कर येणे, आकडी येणे किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. वातावरणातील रासायनिक बदलांमुळे ओझोनचा थर आणि हवामानावर परिणाम होऊ शकतो.
असे यापूर्वी कधी घडले आहे का?
आज हे एखाद्या कथेसारखे किंवा काल्पनिक चित्रपटाच्या कथेसारखे वाटत असले, तरी अनेक अहवालानुसार, अशी घटना सुमारे 30 कोटी वर्षांपूर्वी घडली होती. आज पृथ्वीवर 21 टक्के ऑक्सिजन आहे; त्या काळात पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे 30 टक्के होते. पुरातत्वीय सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की त्या काळात आढळलेले प्राणी खूप मोठे आणि शक्तिशाली होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ऑक्सिजनचा मानवी शरीराच्या आकारावर आणि मेंदूच्या आकार आणि विकासावर परिणाम होतो. शरीरात तयार होणाऱ्या सर्व ग्लुकोज आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावतो.
हे ही वाचा : 'कोंबडी' कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? बहुतेक लोक देऊ शकत नाहीत यांचं उत्तर, तुम्हाला माहित आहे का?
हे ही वाचा : निसर्गाचा चमत्कार! सापाने नव्हे, तर चक्क बेडकाने गिळला साप; दृश्य पाहून स्थानिकांची उडाली झोप
