TRENDING:

Deepfake : डीपफेक थांबवण्यासाठी व्हॉट्सॲपचा पुढाकार, 4 भाषांमध्ये मिळणार सुविधा

Last Updated:

आजकाल नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जात असून सतत काहीतरी नवीन गोष्टी समोर येतात. अशातच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सविषयी सध्या अनेक कानी येत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आजकाल नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जात असून सतत काहीतरी नवीन गोष्टी समोर येतात. अशातच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सविषयी सध्या अनेक कानी येत आहेत. सोशल मीडियावर तर याचा सर्रास वापर होत असून याचे अनेक फायदे आणि तोटेही आहेत. AI च्या मदतीनं काही लोक अनेक फोटो, व्हिडीओंचा गैरवापर करत आहेत. याच्या चुकीचा वापर करत काही लोक डीपफेक फोटो व्हिडीओ बनवत आहेत.
डीपफेक थांबवण्यासाठी व्हॉट्सॲपचा पुढाकार
डीपफेक थांबवण्यासाठी व्हॉट्सॲपचा पुढाकार
advertisement

रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे संपूर्ण इंटरनेचवर खळबळ उडाली होती. मात्र तो AIआर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापरानं बनवला होता. हे तुमच्यासोबतही घडू शकतो. तुमच्या पुर्सनल गोष्टींचा गैरवापर केला जाऊ शकतो.

Whatsapp स्टेटसमध्ये होणार बदल? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

डीपफेकचा धोका टाळण्यासाठी 20 हून अधिक कंपन्या एकत्र काम करत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत लोक याचे बळी पडत असल्यामुळे हा आता मोठा चिंतेचा विषय बनला आहे. मार्क झुकरबर्गची कंपनी मेटा आणि मिसइन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्स (एमसीए) ने यावर काम केलंय. लोकांना डीपफेकपासून वाचवण्यासाठी मेटाने गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केलं आणि एक हेल्पलाइन नंबर जारी केला. या नंबरच्या मदतीने लोक सहजपणे बनावट व्हिडिओंविरोधात तक्रार करू शकतील.

advertisement

व्हॉट्सअॅपचा हा हेल्पलाईन नंबर चार भाषांमध्ये काम करेल. हिंदी आणि इंग्रजी सोबतच तामिळ, तेलुगु इत्यादी भारतातील स्थानिक भाषा देखील आहेत. यासाठी डीपफेक ॲनालिसिस युनिट चार पिलर ॲप्रोच डिटेक्शन, रिपोर्टिंग आणि ड्रायव्हिंग जागरूकता यावर काम करेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक निरनिराळ्या प्रकारचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असातत. यातील काही तर एडिट केलेले फेक असतात. त्यामुळे सोशल मीडिया जेवढ्या उपयोगी आहे तेवढाच धोकादायकही.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Deepfake : डीपफेक थांबवण्यासाठी व्हॉट्सॲपचा पुढाकार, 4 भाषांमध्ये मिळणार सुविधा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल