TRENDING:

मुघलांच्या हरममध्ये महिला कुठून आणल्या जायच्या? शाही ठिकाणाबद्दल अनेकांना चुकीचा समज

Last Updated:

ऐतिहासिक चित्रपट, मालिका आणि कथांमध्येही हरमचे असेच सोपे आणि अनेकदा चुकीचे चित्रण केले जाते. यामुळे सामान्य लोकांच्या मनात हरमबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुघल साम्राज्याचा (Mughal Empire) इतिहास हा नेहमीच आकर्षक आणि गूढ राहिलेला आहे. या इतिहासातील 'हरम' (Harem) हा शब्द ऐकताच अनेक लोकांच्या मनात केवळ ऐश-आरामाची जागा आणि शेकडो स्त्रियांची गर्दी असे चित्र उभे राहते. ऐतिहासिक चित्रपट, मालिका आणि कथांमध्येही हरमचे असेच सोपे आणि अनेकदा चुकीचे चित्रण केले जाते. यामुळे सामान्य लोकांच्या मनात हरमबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

पण, वास्तविक इतिहासकार आणि त्यांच्या संशोधनानुसार, मुघलांचा हरम हे केवळ विलासी जीवनशैलीचे प्रतीक नव्हते, तर ते एक मोठे, जटिल आणि बहुआयामी केंद्र होते. हा एक महलच्या आतील महल होता. जिथे केवळ बादशाहच्या पत्नीच नव्हे, तर राजकारण, कला, शिक्षण आणि धर्म यांसारख्या अनेक गोष्टींची गुंफण झालेली होती. या लेखात आपण मुघलांचा हरम कसा होता, स्त्रिया कुठून येत होत्या, त्यांना कोणते स्थान मिळत होते आणि हरमातील नियम काय होते, हे सविस्तर जाणून घेऊया.

advertisement

इतिहासकार सतीश चंद्र, इरफान हबीब आणि जॉन एफ. रिचर्ड्स यांसारख्या विद्वानांच्या मते, मुघल हरम हा बादशाहचा खाजगी निवास होता. यात केवळ त्याच्या कायदेशीर पत्नी (बेगमात) किंवा उपपत्नी (रखैली) नव्हत्या, तर राजकुमारी, विधवा राजकुमार्या, शाही परिवारातील वृद्ध स्त्रिया, दासी, गुलाम आणि पहारेकरी यांचाही मोठा समावेश होता.

ऐनीमेरी शिमेल आणि लिसा बालबरी वर्दी यांच्या संशोधनानुसार, हरम हे केवळ लैंगिक सुखाचे ठिकाण नव्हते, तर ते शिक्षण, कला, धर्म आणि कधीकधी राजकारणाचीही एक महत्त्वाची प्रयोगशाळा होती.

advertisement

हरमात स्त्रियांचे विविध गट होते आणि त्यांचे स्थान वेगवेगळे होते:

शाही बेगमात (कायदेशीर पत्नी): हुमायूंची हमीदा बानो बेगम, अकबराची मरियम उझ जमानी (जोधा बाई), जहांगीरची नूरजहाँ यांसारख्या राण्यांना सर्वोच्च स्थान होते. त्यांना स्वतःचा महल, नोकरचाकर आणि आर्थिक स्वायत्तता असे.

उपपत्नी : यांना 'माहिल' किंवा 'खास औरतें' असेही म्हटले जाई. यांची संख्या बेगमातंपेक्षा जास्त असली तरी त्यांचा दर्जा कमी होता.

advertisement

गुलाम महिला (Slave Women): या स्त्रिया सेवा देण्यासाठी हरमात असत. पण जर बादशाहची त्यांच्यावर मर्जी झाली, तर त्यांचा दर्जा वाढून त्या रखैली बनू शकत होत्या.

राजकीय विवाह आणि करारामुळे आलेल्या स्त्रिया: राजकीय संबंध दृढ करण्यासाठी किंवा संधी साधण्यासाठी राजपूत राजघराणी आणि इतर सरदारांच्या कन्या आणि त्यांच्यासोबत आलेल्या दासीही हरमाचा भाग होत असत.

advertisement

हरमासाठी स्त्रिया कुठून येत होत्या?

मुघल सम्राटांच्या हरमात शेकडो ते हजारो स्त्रिया होत्या असे मानले जाते. या स्त्रिया विविध मार्गांनी हरमात येत असत:

राजकीय विवाह (Political Marriages): अकबराने आमेर, जोधपुर, बिकानेर, जैसलमेर अशा अनेक राजपूत राजघराण्यांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित केले. या विवाहातून आलेल्या राण्यांसोबत त्यांच्या दासी आणि सखीही हरमात येत.

दास व्यापार (Slave Trade): इराण, मध्य आशिया, काबूल, काश्मीर, बंगाल आणि दख्खनसारख्या प्रदेशातून स्त्रियांना दास व्यापाराद्वारे विकत घेतले जाई. युद्धात कैद झालेल्या स्त्रियाही हरमात किंवा शाही सेवक म्हणून दाखल होत.

दरबारी भेट (Gifts to Emperor): अकबर, जहांगीर आणि शाहजहानच्या काळात, काही सरदार आणि उमराव आपले सामाजिक स्थान आणि शाही संरक्षण मिळवण्यासाठी आपल्या मुली किंवा नात्यातील स्त्रिया बादशाहच्या दरबारात 'भेट' म्हणून पाठवत असत.

हरममध्ये प्रवेश मिळवणे सोपे नव्हते. ही एक अत्यंत नियंत्रित आणि सुरक्षित व्यवस्था होती:

सख्त सुरक्षा: हरमात पुरुषांना प्रवेश निषिद्ध होता. हिजडे (नपुंसक) आणि अत्यंत विश्वासू गुलाम हेच हरमाचे पहारेकरी असत. बर्नियर आणि मनूची या परदेशी प्रवाशांच्या नोंदीनुसार, कोणत्याही पुरुषाला परवानगीशिवाय हरमाजवळ जाण्याचीही मुभा नव्हती.

हरम हे केवळ एक बंदिस्त ठिकाण नव्हते. हमीदा बानो बेगम, नूरजहाँ आणि जहाँआरा बेगम यांसारख्या अनेक शाही स्त्रिया शिक्षित होत्या, त्यांना अनेक भाषा अवगत होत्या आणि त्या काव्य, संगीत, सूफीवाद आणि दानधर्मात सक्रिय होत्या. नूरजहाँने तर जहांगीरच्या राजवटीत राजकीय निर्णयां प्रभावित केले होते.

हरमातून बाहेर पडणे, पाहुण्यांना भेटणे, खरेदी करणे किंवा उत्सव साजरे करणे यासाठी कठोर नियम आणि प्रोटोकॉल होते. विशेष सुरक्षा व्यवस्थेतच स्त्रियांना काहीवेळा बाहेर जाण्याची परवानगी मिळे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बॅगेत सापडलेले 10 लाख रुपये परत दिले, महिलेचं उत्तर ऐकून तुम्ही कराल कौतुक
सर्व पहा

मुघलांचा हरम हे केवळ एक रहस्यमय ठिकाण नव्हते, तर ते एक जटिल सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होते, जिथे स्त्रियांचे जीवन विविध पैलूंनी भरलेले होते.

मराठी बातम्या/Viral/
मुघलांच्या हरममध्ये महिला कुठून आणल्या जायच्या? शाही ठिकाणाबद्दल अनेकांना चुकीचा समज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल