TRENDING:

Electric Shock : दरवाजा उघडताना झटका बसतोय? हात मिळवतानाही जाणवतो 'करंट'? यामागचं सायन्स तुम्हाला माहित आहे का?

Last Updated:

Why Do I Get an Electric Shock : कधीकधी तर माणसाला हात लावला तरी देखील करंट लागतो. कधीकधी तर ऑफिसचा दरवाजा उघडताना देखील हलकासा झटका बसतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात अनेकदा अनुभव आला असेल की कोणत्याही गोष्टीला हात लावला की करंट लागतो. कधीकधी तर माणसाला हात लावला तरी देखील करंट लागतो. कधीकधी तर ऑफिसचा दरवाजा उघडताना देखील हलकासा झटका बसतो. हे अगदी हलकंसं असतं, पण काही वेळा हा झटका खूप विचित्र वाटतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

ही गोष्ट जरी मजेशीर वाटत असली, तरी यामागे एक शुद्ध शास्त्रीय कारण असतं, ज्याला "स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी" (Static Electricity) किंवा स्थिर विद्युत प्रवाह असं म्हटलं जातं.

स्टॅटिक चार्ज म्हणजे नेमकं काय?

जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर घासल्या जातात, जसं की केसांना कंगवा करणं, सिंथेटिक कपडे घालणं, मोबाइलला प्लास्टिकचा कवर असणं, तेव्हा त्यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते. या प्रक्रियेमुळे शरीरावर किंवा वस्तूंवर स्टॅटिक चार्ज जमा होतो.

advertisement

जेव्हा चार्ज झालेलं शरीर एखाद्या कंडक्टर, जसं की लोखंडी दरवाजा किंवा दुसरं व्यक्तीचं शरीराशी संपर्कात येतं, तेव्हा हा चार्ज एका क्षणात डिसचार्ज होतो. त्या क्षणीच आपल्याला "करंट" लागल्यासारखं जाणवतं.

उन्हाळ्यात हे अधिक का होतं?

एमिटी युनिव्हर्सिटी, नोएडाचे डॉ. अनूप कुमार शुक्ला सांगतात की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवा कोरडी आणि ओलावा-विरहित असतो. ओलावा कमी असल्यामुळे चार्ज आपोआप नष्ट होत नाही. त्यामुळे तो शरीरावर साचत राहतो. एकदा का चार्ज खूप साचला, की तो अचानक संपर्कात आल्यावर जोरात डिसचार्ज होतो आणि त्यामुळेच झटका जाणवतो.

advertisement

हा करंट धोकादायक आहे का?

नाही, सामान्यतः हा स्टॅटिक शॉक घातक नसतो. पण वारंवार असे झटके बसत असतील, तर ते अस्वस्थ करणारे ठरू शकतात. अशा वेळी काही साधे उपाय करून या त्रासापासून बचाव करता येतो.

काय उपाय करावेत?

सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटन किंवा सिल्क वापरा

त्वचा हायड्रेट ठेवा – भरपूर पाणी प्या आणि मॉइश्चरायझर वापरा

advertisement

घरात ह्युमिडिफायर लावा – यामुळे हवेत ओलावा राहतो

एंटी-स्टॅटिक स्प्रेचा वापर करा

फुटवेअरमध्ये रबर सोल टाळा – यामुळे चार्ज वाढू शकतो

थोडक्यात काय?

उन्हाळ्यात बसणारा 'करंट' हा कुठलाही विजेचा धक्का नसून तो आपल्या शरीरावर जमा झालेल्या स्थिर विद्युत ऊर्जा म्हणजेच Static Charge मुळे होतो. हा एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रकार आहे. योग्य उपायांमुळे आपण या प्रकाराला सहज टाळू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Electric Shock : दरवाजा उघडताना झटका बसतोय? हात मिळवतानाही जाणवतो 'करंट'? यामागचं सायन्स तुम्हाला माहित आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल