TRENDING:

Weekly Holiday : साप्ताहिक सुट्टी रविवारीच का दिली जाते? यामागे काय लॉजिक आहे

Last Updated:

प्रत्येक आठवड्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी असते. खास करुन रविवार. जवळपास प्रत्येक कंपनीमध्ये रविवारीच साप्ताहिक सुट्टी दिली जाते. मात्र रविवारीच का सुट्टी दिली जाते?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : प्रत्येक आठवड्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी असते. खास करुन रविवार. जवळपास प्रत्येक कंपनीमध्ये रविवारीच साप्ताहिक सुट्टी दिली जाते. मात्र रविवारीच का सुट्टी दिली जाते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? यामागे काय लॉजिक आहे.
साप्ताहिक सुट्टी रविवारीच का दिली जाते?
साप्ताहिक सुट्टी रविवारीच का दिली जाते?
advertisement

रविवार सगळ्यांचा आवडता दिवस आहे. कारण या दिवशी सर्वांनाच सुट्टी असते. हा सुट्टीचा आणि आरामाच दिवस असतो. सरकारी नोकरीपासून प्रायव्हेज जॉबमध्येही रविवारी सुट्टी दिली जाते. आठवड्याभरता कोणताही दिवस सुट्टीसाठी निवडता आला असता मात्र रविवारच का निवडण्यात आला आणि यामागे काय लॉजिक आहे जाणून घेऊया.

Viral Video : शेतात माणसांप्रमाणे काम करताना दिसला रोबोट, तुफान स्पीडनं कापतोय पीक

advertisement

स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी ब्रिटीश सरकार होती. तेव्हा सर्व अधिकारी आठवडाभर काम करायचे आणि रविवारी चर्चला जायचे. मात्र कामगारांना कुठलीच सुट्टी दिली जायची नाही. हे पाहून कामगारांचे नेता नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या बाजूने ब्रिटीश सरकारसोबत चर्चा केली आणि रविवारी सुट्टी देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र हा प्रस्ताव ब्रिटिश सरकारनं अमान्स केला. या सुट्टीसाठी नारायण लोखंडे आठ वर्ष लढत राहिले. अखेर 10 जुलै 1890 मध्ये हा प्रस्ताल मान्य करण्यात आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

आंतराराष्टीय मान्यतेनुसार, आठवड्याचा शेवट रविवारी होतो. त्यामुळे शेवटच्या दिवशी आराम हवा. आणि शाळेतील मुलांनाही रविवारी सुट्टी देण्याचं ब्रिटीश सरकारनं प्रस्ताव दिला. कारण मुलं या दिवशी काहीतरी वेगळं आणि इतर क्रिएटिव्ह गोष्टी करतील. अशा प्रकारे रविवार हा सु्ट्टीचा दिवस बनला.

मराठी बातम्या/Viral/
Weekly Holiday : साप्ताहिक सुट्टी रविवारीच का दिली जाते? यामागे काय लॉजिक आहे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल