मुघल बादशाहांचा हरम म्हणजे त्यांचा खास स्त्रियांसाठीचा भाग, जिथे त्यांच्या बेगम, मुली, सूनबाई आणि दास्या राहत असत. या हरममध्ये साधारण पाच हजार स्त्रिया आणि त्यांची सेवा करणाऱ्या दास्या, तसेच किन्नर (eunuchs) असत. बाहेरच्या जगात कोणी पुरुष प्रवेश करू शकत नसे. तरीही, या सोन्याच्या पिंजऱ्यात राहणाऱ्या बेगमांच्या आयुष्यातील संध्याकाळ हा सर्वात बेचैन काळ असायचा.
advertisement
कारण संध्याकाळ झाली की सुरू व्हायची “बादशाहाच्या पसंतीची परीक्षा”. प्रत्येक बेगमला स्वतःला सजवणं, सुंदर दिसणं आणि सम्राटाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं ही मोठी जबाबदारी असायची. जेव्हा दरबारात संध्याकाळी बादशाहासाठी निवड केली जायची, तेव्हा कोणत्या बेगमकडे त्यांचं लक्ष जाईल, यावर त्या स्त्रीचं नशीब ठरायचं.
जर एखादी बेगम योग्यप्रकारे सजली नसती, तिच्या वागण्यात काही त्रुटी असती, किंवा बादशाहाच्या मनाप्रमाणे ती वागली नसेल, तर ती तत्काळ रिजेक्ट केली जायची. मग तिची पुन्हा बारी येण्यासाठी महिने, कधी कधी वर्षे लागायची. या भीतीमुळे अनेक राण्या रात्र होताच अस्वस्थ, बेचैन व्हायच्या. त्या दररोज आरशात स्वतःला पुन्हा पुन्हा पाहायच्या, दागिने बदलायच्या, सुगंध वापरायच्या हे सगळं फक्त बादशाह खुश व्हावा म्हणून.
इतिहासकारांच्या मते, या हरममध्ये सत्ता, सौंदर्य आणि मत्सर यांचा सतत संघर्ष चालायचा. एका बाजूला वैभवशाली जीवन होतं, तर दुसऱ्या बाजूला मानसिक कैद आणि असुरक्षितता. मुघल दरबारात सत्ता पुरुषांच्या हातात असली तरी, स्त्रिया त्या सत्तेचा मौन बळी ठरत होत्या.
म्हणूनच म्हणता येईल मुघल हरम हा केवळ ऐश्वर्याचा नाही, तर एक अदृश्य संघर्षाचा देखील भाग होता. जिथे प्रत्येक रात्र एका राणीच्या स्वप्नांचं आणि आत्मसन्मानाचं युद्ध ठरायचं.
