TRENDING:

General Knowledge : आकाशात अगणित तारे चमकतात तरी अंतराळात अंधार का?

Last Updated:

Why darkness in space : संशोधक या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहेत. पण एका सिद्धांताने या प्रश्नाचे काही अंशी उत्तर शोधलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  आकाशात अगणित तारे चमकताना दिसतात. खरं तर हे दृश्य खूप विलोभनीय असतं. पण आकाशात अगणित तारे चमकत असताना देखील अवकाशात अंधार का असतो, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. संशोधक या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहेत. पण एका सिद्धांताने या प्रश्नाचे काही अंशी उत्तर शोधले आहे. या बाबत ओल्बर्सचा ‘पॅराडॉक्स सिद्धांत’ नेमकं काय सांगतो ते जाणून घेऊया.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

अवकाशात 3200 सूर्यमाला आहेत. प्रत्येक सूर्यमालेत असंख्य तारे आहेत. आपल्या एकट्या सूर्यतमालेत 100 अब्जांपेक्षा जास्त तारे आहे, असा अंदाज व्यक्त केला जातो. पण दीर्घकाळापासून एका प्रश्नाचं गूढ कायम आहे. जर आकाशात असंख्य तारे आहेत तर अवकाशात एवढा अंधार का असतो, या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेले नाही. विश्वातील अनेक गूढ आजही कायम आहेत. असेच एक गूढ ताऱ्यांशी संबंधित आहे. वायूपासून बनलेल्या आकाशातील खगोलीय भूभागाला तारे असं म्हटलं जातं.अणू विक्रियांमुळे ते उष्णता आणि प्रकाश निर्माण करतात. त्यामुळे ते चमकतात. त्यांची निर्मिती आणि तुटणं ही प्रक्रिया कायम सुरू असते. मग अवकाशात अंधार का असतो, हा प्रश्न कायम राहतो. पण ओल्बर्सच्या पॅराडॉक्स सिद्धांताने या प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे.

advertisement

असा प्रश्न ज्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही; तुम्हाला येतंय का, ट्राय करून पाहा

तारे हे अवकाशातील भूभाग असतात जे विविध वायूंपासून तयार झालेले असतात. ते खूप उष्ण असतात. त्यांचे तापमान हजारो आणि कोट्यवधी अंशापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हायड्रोजनचे अणू एकमेकांवर आदळून हेलियम बनतात. यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि ती प्रकाशासारखी चमकते. ताऱ्यांच्या मध्यभागी असलेली ही ऊर्जा पृष्ठभागावर पोहोचते आणि प्रकाशाच्या स्वरूपात पसरते. याशिवाय संतुलित गुरूत्वाकर्षण हे देखील एक कारण आहे. हे बळ ताऱ्यांना आतल्या बाजूला खेचतं आणि ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे तारे जास्त चमकतात. ताऱ्यांचा प्रकाश हा त्यांच्यातील तापमानावर अवलंबून असतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. जास्त उष्ण तारे निळे किंवा पांढऱ्या रंगाचे दिसतात. जर तापमान मध्यम असेल तर ते सूर्यासारखे पिवळ्या रंगाचे देखील दिसतात. जर तारे थंड असतील तर ते बिटलग्यूजसारखे लाल रंगाचे दिसतात.

advertisement

जर्मन खगोलशास्त्रज्ञ हेन्रिक विल्हेम ओल्बर्स यांच्या नावावरून या सिद्धांताचं नाव ठेवलं गेलं आहे. या सिद्धांतानुसार, जेव्हा अवकाश आणि सर्व दिशांना समप्रमाणात तारे असतात त्यावेळी आकाशात अंधार असला तरी आपल्याला ते चमकताना दिसतात. या सिद्धांत यामागील महत्त्वाची कारणं विशद केलेली आहेत.

Mysterious Hotel : जगातील गूढ हॉटेल, जेथे कोणीही राहू शकलं नाही, काय आहे यामागचं रहस्य?

advertisement

पॅराडॉक्स सिद्धांतानुसार, पृथ्वीवरून तारे खूप जवळ दिसत असले तरी ते अवकाशात दूरवर विखुरलेले असतात. या ताऱ्यांमधील अंतर आणि पृथ्वीपासूनचे त्यांचे अंतर यामुळे ताऱ्यांचा प्रकाश मंदावत जातो. त्यामुळे अवकाशात त्यांचा प्रकाश पडत नाही तसेच तो पृथ्वीपर्यंत देखील पोहोचू शकत नाही.

आपले अवकाश सातत्याने विस्तारत असते. यामुळे तारकापुंजांपासून दूर असलेल्या आकाशगंगामधील ताऱ्यांचा प्रकाश लालसर होतो. याचा अर्थ त्यांच्या प्रकाशाची तरंगलांबी जास्त होते. परिणामी प्रकाशाचे स्वरूप बदलते आणि ते आपल्याला दिसू शकत नाहीत. अवकाशातील ताऱ्यांमधील अंतर खूप विस्तीर्ण आहे. या भागात प्रकाश परावर्तित करू शकणारे घटक नाहीत. त्यामुळे काही अंतरावर गेल्यावर चमकणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश नाहीसा होतो.

advertisement

अवकाशात वायू आणि धुळीचे ढग आहेत. ते ताऱ्यांमधून येणारा प्रकाश शोषून घेतात. त्यामुळे त्यांचा प्रकाश कमी होतो आणि तो आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. सर्व तारे हे सूर्याप्रमाणे चमकत नाहीत. ते लहान आणि थंड असल्याने त्यात प्रकाश कमी असतो. याशिवाय सर्व तारे एकाचवेळी चमकत नाहीत. त्यांच्या निर्मितीची आणि नष्ट होण्याची प्रक्रिया एका ठराविक कालावधीपर्यंत मर्यादित असते, असं या सिद्धांत म्हटलं आहे.

मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : आकाशात अगणित तारे चमकतात तरी अंतराळात अंधार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल