advertisement

Mysterious Hotel : जगातील गूढ हॉटेल, जेथे कोणीही राहू शकलं नाही, काय आहे यामागचं रहस्य?

Last Updated:

हे हॉटेल खूप भव्य आणि सुंदर आहे, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथं आजपर्यंत कोणीही थांबलेले नाही. चला तर जाणून घेऊया या रहस्यमय हॉटेलबद्दल.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : लोकांना जगातील विचित्र, अद्भूत किंवा गुढ गोष्टींबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते. त्यामुळे लोक अशा गोष्टींची सोशल मीडियावर माहिती मिळवतात. आज आम्ही देखील अशाच एका गुढ ठाकाणाबद्दल सांगणार आहोत, जे एक हॉटेल आहे आणि त्याचे धक्कादायक रहस्य देखील आहे. याच कारणामुळे आजपर्यंत ना ही इमारत तयार होऊ शकली ना कोणी राहू शकलं.
ही एक पिरॅमिड आकाराची गगनचुंबी इमारत आहे, ज्यामध्ये हॉटेल बांधले आहे. हे हॉटेल खूप मोठं आहे, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथं आजपर्यंत कोणीही थांबलेले नाही. चला तर जाणून घेऊया या रहस्यमय हॉटेलबद्दल.
या रहस्यमय हॉटेलचे अधिकृत नाव Ryugyong आहे, पण ते Yu-Kyung म्हणूनही ओळखले जाते. हे हॉटेल उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे आहे आणि त्याची उंची 330 मीटर आहे. यात एकूण 105 खोल्या आहेत, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत येथे कोणीही थांबलेला नाही. या हॉटेलला 'कर्स्ड हॉटेल' किंवा 'झपाटलेले हॉटेल' असेही म्हणतात.
advertisement
याशिवाय '105 बिल्डिंग' म्हणूनही ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी, अमेरिकन मासिक एस्क्वायरने या इमारतीला मानवी इतिहासातील सर्वात वाईट इमारत म्हटले होते.
Ryugyong हॉटेल बांधण्यासाठी सुमारे 55 अब्ज रुपये खर्च आला, जो त्या वेळी उत्तर कोरियाच्या GDP च्या दोन टक्के होता. हे हॉटेल जगातील सर्वात उंच हॉटेल असणार होते, परंतु ते आजपर्यंत कधीही उघडले नाही आणि त्याच्या निर्जन अवस्थेमुळे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. हे हॉटेल वेळेवर पूर्ण झाले असते तर ते जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आणि सर्वात उंच हॉटेल ठरले असते.
advertisement
या हॉटेलचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले.
या हॉटेलचे बांधकाम 1987 साली सुरू झाले आणि ते दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, बांधकामादरम्यान बांधकाम साहित्याचा तुटवडा आणि बांधकामाशी संबंधित तांत्रिक अडचणींसह अनेक समस्या उद्भवल्या. या कारणांमुळे अनेकवेळा बांधकाम थांबले. त्यानंतर 1992 मध्ये उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने बांधकाम पूर्णपणे थांबले. मात्र, 2008 मध्ये पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आले. या भव्य इमारतीच्या व्यवस्थेसाठी सुमारे 11 अब्ज रुपये खर्च करण्यात आले. यानंतर इमारतीत काचेचे फलक बसविण्यात आले आणि इतर किरकोळ कामे पूर्ण झाली, मात्र तरीही हॉटेल पूर्णत: कार्यान्वित होऊ शकले नाही.
advertisement
Ryugyong हॉटेल अजूनही अपूर्ण आहे
2012 मध्ये उत्तर कोरियाच्या सरकारने रयुग्योंग हॉटेलचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्याचा दावा केला होता. मात्र, तारखांमध्ये वारंवार बदल करूनही हे हॉटेल आजतागायत अपूर्णच आहे. बांधकामातील सततचे अडथळे आणि अडचणींमुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. त्याची विशालता आणि पिरॅमिड आकार असूनही, हे हॉटेल जगाला एक रहस्यमय आणि अपूर्ण इमारत म्हणून दिसते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Mysterious Hotel : जगातील गूढ हॉटेल, जेथे कोणीही राहू शकलं नाही, काय आहे यामागचं रहस्य?
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement