भारतीयांकडे जुगाडाची कमी नाही. एखादी अडचण किंवा समस्या समोर आली की त्यावर काही ना काही जुगाड असतोच. असाच एक जुगाडू तरुण. ज्याने गॅस संपल्यावर चपाती करण्याता जुगाड दाखवला आहे. सामान्यपणे चपाती आपण पोळपाटावर लाटून ते गॅसवर शेकवतो. तसं चपाती बनवण्यासाठी रोटीमेकर उपलब्ध आहे, ज्यावर चपाती लाटून शेकूनही येते. पण रोटीमेकर सर्वांकडेच असतं असं नाही. अशा लोकांसाठी गॅसशिवाय चपाती शेकवण्याचा हा जुगाड.
advertisement
Kitchen Jugaad Video : रात्री झोपण्याआधी न विसरता गॅसवर ठेवा कांदे; कुटुंबावरील मोठा धोका टळेल
व्हिडीओत तुम्ही पाहाल तरुण चपाती बनवत असतो. त्याचवेळी गॅस संपतो. त्यानंतर त्याला एक आयडिया सुचते. पुढे तुम्ही पाहाल तर तो इस्त्री घेऊन बसते. कपडे आयर्न करण्याची इस्त्री उलटी ठेवतो आणि त्यावर तो चपाती ठेवतो. व्हिडीओत तुम्ही पाहिल तर चपाती फुलतानाही दिसते. तरुण दोन्ही बाजूंनी ती नीट शेकवून घेतो. अगदी तव्यावर जशी चपाती शेकते, तशीच ती इस्त्रीवरही शेकते.
व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहे. तरुणाच्या जबरदस्त जुगाडामुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तसा हा व्हिडीओ मजेशीर आहे. तो मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. पण चपाती शेकवण्याची ही पद्धत किती योग्य आहे. सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असं करा असं आम्ही बिलकुल सांगत नाही.
ट्रेनच्या दरवाजापेक्षाही जीवघेणी आहे आतील ही जागा, इथं क्षणार्धात होऊ शकतो मृत्यू; पाहा VIDEO
@maximum_manthan इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
