advertisement

ट्रेनच्या दरवाजापेक्षाही जीवघेणी आहे आतील ही जागा, इथं क्षणार्धात होऊ शकतो मृत्यू; पाहा VIDEO

Last Updated:

ट्रेनच्या आतील ही जागा सर्वात खतरनाक आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

ट्रेनच्या आतील खतरनाक जागा.
ट्रेनच्या आतील खतरनाक जागा.
नवी दिल्ली, 05 ऑगस्ट :  सहसा रेल्वे प्रवाशांना चालत्या ट्रेनमधून उतरू किंवा चढू नका, ट्रेनच्या दारात उभं राहू नका किंवा दरवाजाला लटकू नका, अशा सूचना वारंवार देत असतं.  ट्रेनचा दरवाजा म्हणजे ट्रेनमधील धोकादायक जागा. पण तुम्हाला माहिती आहे का ट्रेनच्या दरवाजापेक्षाही खतरनाक जागा ट्रेनच्या आतमध्ये आहे. इथं तुम्ही उभं राहिलात किंवा बसलात तर क्षणार्धात तुमचा मृत्यू होऊ शकतो. या जागेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
ट्रेनमधील सर्वात जीवघेण्या अशा या जागेबद्दल लोकांना जागरूक करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रवाशांनी ट्रेनच्या आतमध्ये असलेल्या या जागेवर चुकूनही उभं राहू नये किंवा बसू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल तर तुम्हाला याच ठिकाणी बरेच प्रवासी बसलेले, उभे राहिलेले दिसतील. जेव्हा ट्रेनमध्ये लोक चढत असतात तेव्हा इतर प्रवाशांना जागा देण्यासाठी किंवा दरवाजावरील गर्दी टाळण्यासाठी लोक इथं उभं राहतात. पण इथं उभं राहणं किंवा बसणं म्हणजे मृत्यूच्या दारातच बसण्यासारखं आहे. आता ही जागा कोणती ते पाहुयात.
advertisement
व्हिडीओत दाखवल्यानुसार तुम्ही पाहाल तर ही जागा आहे. ट्रेनच्या दोन डब्यांना जोडणारी जागा. जिथं दोन बोगी एकत्र येतात. मध्ये दोन्ही बाजूने पत्रे असतात. हा भाग ट्रेन चालताना हलतही असतो. या जागेच्या खाली एक कपलिंग असतं. सहसा कपलिंग उघडत नाही. पण जर चुकून कपलिंग कधी उघडलं गेलं तर काय होईल हेसुद्धा या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
advertisement
कपलिंग वेगळं झाल्यावर ट्रेनचे दोन डबे वेगळे होतात. यामुळे तुम्ही त्या जागेवर असाल तर सरळ ट्रेनखाली रूळांवर पडाल आणि ट्रेनच्या चाकाखाली याल. यानंतर जीव वाचण्याची शक्यता नाहीच. यामुळे यापुढे ट्रेनने प्रवास करताना ही जागा कायम लक्षात ठेवा. चुकूनही इथं उभं राहू नका.
advertisement
advertisement
इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
ट्रेनच्या दरवाजापेक्षाही जीवघेणी आहे आतील ही जागा, इथं क्षणार्धात होऊ शकतो मृत्यू; पाहा VIDEO
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement