advertisement

गॅस सिलेंडरमधून आला विचित्र आवाज, नंतर दिसले दोन डोळे; किचनमधील थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Last Updated:

एका घरातील किचनमधील या भयंकर दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सिलेंडरखाली लपून बसला होता 'मृत्यू' (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
सिलेंडरखाली लपून बसला होता 'मृत्यू' (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली,  05 ऑगस्ट : गॅस सिलेंडर वापरताना काळजी घ्यावी लागते. गॅस सिलेंडरबाबतीत छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. बऱ्याचदा गॅस सिलेंडर लीक होतो किंवा त्यातून विचित्र वास होतो. पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात गॅस सिलेंडरमधून वास नाही तर विचित्र आवाज येऊ लागला. इतकंच नव्हे तर काही वेळाने सिलेंडरमधून दोन डोळेही चमकताना दिसले. एका घरातील किचनमधील या भयंकर दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एका घरातील गॅस सिलेंडरच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. थरकाप उडवणारा असा हा व्हिडीओ. गॅस सिलेंडरमध्ये असं काही होतं, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल, तुम्ही ते पाहिलं नसेल. हा गॅस सिलेंडर पाहिल्यानंतर त्या घरातील संपूर्ण कुटुंब हादरलं. घरातील सर्व सदस्यांना घाम फुटला. त्यांनी सत्य समजताच किचनमधून पळ काढला.
advertisement
किचनमध्ये सुरुवातीला महिलेला सिलेंडरमधून विचित्र आवाज आला. गॅस गळती होते की काय असं तिला वाटलं. तिने सिलेंडर तपासला तेव्हा तिला सिलेंडरखाली काहीतरी हलत असल्याचं समजलं. त्यानंतर तिला दोन डोळे दिसेल. तेव्हा ती घाबरून किचनमधून बाहेर पळाली, कुटुंब घाबरलं. असं या सिलेंडरखाली काय होतं?
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सिलेंडरच्या खालच्या भागाजवळ जिथं छेद आहेत तिथून तुम्हालाही दोन डोळे चमकताना दिसतील. अचानक या छिद्रातून एक डोकं बाहेर येतं. हा दुसरा तिसरा कुणी नाही तर चक्क साप आहे. सिलेंडरच्या खालच्या बाजूला गोलाकार ठिकाणी हा साप बसला आहे. सिलेंडर जसा उचलला जातो तसा हा साप फणा काढून समोर उभा राहतो. हा साधासुधा साप नाही तर किंग कोब्रा आहे. किंग कोब्राचं पिल्लू आहे.
advertisement
पावसाळ्यात साप, विंचू  असे बरेच प्राणी बाहेर पडतात. अशा अनपेक्षित ठिकाणी ते दिसू लागतात. कधी बाईक, कधी टॉयलेटमध्ये तर कधी शूझज्या आत साप  सापडल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तेसुद्धा तुम्ही पाहिले असतील. आता किचनमधील गॅस सिलेंडरखालीही साप दिसला आहे. त्यामुळे जरा जास्त काळजी घ्या.
advertisement
advertisement
@sarpmitra_neerajprajapa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
गॅस सिलेंडरमधून आला विचित्र आवाज, नंतर दिसले दोन डोळे; किचनमधील थरकाप उडवणारा VIDEO VIRAL
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement