TRENDING:

हृदय धडधडत नाही तरीही जिवंत आहे 'ही' महिला, विचित्र आजारानं ग्रस्त

Last Updated:

माणसाला कधी, काय आजार होईल सांगता येत नाही. बऱ्यापैकी लोक कोणत्या न कोणत्या आजाराचा शिकार झालेले असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे काही आजार आहेत ज्यांच्याविषयी बहुतेक लोकांना माहितही नसतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : माणसाला कधी, काय आजार होईल सांगता येत नाही. बऱ्यापैकी लोक कोणत्या न कोणत्या आजाराचा शिकार झालेले असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे काही आजार आहेत ज्यांच्याविषयी बहुतेक लोकांना माहितही नसतं. अनेकवेळा विचित्र आजार पाहून डॉक्टरही थक्क होतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिला चक्क बॅटरीच्या सहाय्याने जिवंत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
हृदय धडधडत नाही तरीही जिवंत आहे 'ही' महिला
हृदय धडधडत नाही तरीही जिवंत आहे 'ही' महिला
advertisement

पल्स रेट थांबल्यावर डॉक्टर बाहेर येऊन कुटुंबाला सांगतात की, 'सॉरी आम्ही वाचवू शकलो नाही' असा सीन तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिला असेलच. अशीच घटना सत्यात घडली आहे मात्र यावेळी महिला तरीही जिवंत आहे.

Viral Video : व्यक्तीने मगरीच्या जबड्यात डोकं घातलं, थरारक दृश्य पाहून येईल अंगावर काटा

सोफिया हार्ट असं या महिलेचं नाव आहे. सोफिया 30 वर्षाची असून अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये राहते. सोफियाला 'इरिव्हर्सिबल डायलेटेड कार्डिओमायोपॅथी ' नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक हृदयाच्या आजाराने ग्रासलं आहे . या आजारामुळे तिची पल्स कमी झाली आहे, म्हणजेच या आजारामुळे त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले आहेत. आता हृदयाचा ठोका असल्याशिवाय कोणीही माणूस जगू शकणार नाही. सोफियाला बॅटरीच्या मदतीने जिवंत ठेवण्यात आलं आहे, याविषयी डेली मेलनं रिपोर्ट दिला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

सोफियाला मशिनच्या मदतीने जिवंत ठेवण्यात आलं आहे, ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस म्हणजेच LVAD म्हणतात . हे यंत्र असं आहे की सोफियाचे हृदय सामान्य माणसांप्रमाणेच धडधडते. या मशिनमुळेच ती बॅटरीच्या मदतीने जिवंत असल्याचं स्वत: सोफियाचं म्हणणं आहे. सोफिया सांगते की तिला तिच्या विचित्र आजाराची माहिती गेल्या वर्षीच झाली. सोफियानं सांगितलं की, तिच्या जुळ्या बहिणीलाही हाच आजार होता. तिचं हार्ट ट्रान्सफॉर्मेशन करण्यात आलं. आता सोफियाचंगी हार्ट ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
हृदय धडधडत नाही तरीही जिवंत आहे 'ही' महिला, विचित्र आजारानं ग्रस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल