TRENDING:

ChatGPT ला विचारला असा प्रश्न, महिला मालामाल, AI मुळे जिंकले तब्बल 1,32,00,000 रुपये

Last Updated:

ChatGPT News : चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नाने तिचं नशीबच पालटलं आहे, ती करोडपती बनली आहे. आता या महिलेने चॅटजीपीटीला असा काय प्रश्न विचारला, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : ChatGPT चा वापर अनेक जण करत आहेत. कित्येक जण चॅटजीपीटीला प्रश्न विचारतात, आपल्या समस्यांचं निराकारण करतात. अशीच एक महिला जिने चॅटजीपीटीला एक प्रश्न विचारला. पण या प्रश्नाने तिला मालामाल केलं आहे. तिने चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नाने तिचं नशीबच पालटलं आहे, ती करोडपती बनली आहे. तिने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 1,32,00,000 रुपये जिंकले आहेत. आता या महिलेने चॅटजीपीटीला असा काय प्रश्न विचारला, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
प्रतीकात्मक फोटो (AI Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Image)
advertisement

अमेरिकेच्या व्हर्जिनिया मिडलोथियनमध्ये राहणारी ही महिला. कॅरी एडवर्ड्स असं तिचं नाव. 8 सप्टेंबर रोजी तिने व्हर्जिनिया लॉटरी पॉवरबॉल ड्रॉ जॅकपॉट जिंकला. तिने पहिल्या पाचपैकी चार आकडे आणि पॉवरबॉल जुळवले. यामुळे तिला 50000 डॉलर्सचं बक्षीस मिळालं आणि नंतर तिने एक डॉवर पॉवर प्ले फीचर निवडलं. यामुळे तिचे एकूण जिंकलेले पैसे 150000 डॉलर्स म्हणजे तब्बल 1.32 कोटी रुपये झाले. तिने आपण हे चॅटजीपीटीला विचारलेल्या आकड्यांच्या आधारे जिंकल्याचा दावा केला आहे.

advertisement

Video : चालत्या मेट्रोत प्रवासी हे काय करू लागला? कुणी टकामका पाहतच राहिलं, तर कुणी लाजेने तोंड लपवलं

लॉटरी जिंकण्यासाठी बरेचदा लोक वेगवेगळ्या प्रकारचं गणित करतात, पण त्यांना वाटणारा आकडा त्यांना अपेक्षित असलेलाच असावा असं वाटत नाही. अशा परिस्थितीत काही लोकांनी एआयची मदत घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांनी त्याद्वारे दिलेल्या आकड्यांवर पैज लावण्यास सुरुवात केली आहे. आता या घटनेनंतर काही युझर्स पैसे जिंकण्यासाठी एआयचा वापर करण्याचा विचार करत असतील. पण एआय खरोखरच लोकांना लॉटरी जिंकवण्यास सक्षम आहे का की एखाद्याचं जिंकणं हा केवळ योगायोग आहे? एआय खरोखरच एखाद्याला श्रीमंत बनवू शकतं? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे.

advertisement

याआधी लंडनमधील वेन विल्यम्स नावाच्या एका व्यक्तीने मजेमजेत युरोमिलियन्स लॉटरीसाठी चॅटजीपीटी आणि डीपसीक या दोन वेगवेगळ्या एआयकडून नंबर मागितले. दोन्ही एआयनी अगदी सारखेच क्रमांक दिले. त्यानंतर वेनने एआयने सुचवलेले लॉटरी क्रमांक खरेदी केले. 7, 14, 23, 35, 42, 3 आणि 9. पण तो लॉटरी जिंकला नाही.

Chanakya Niti : चाणक्य यांचे 4 मंत्र बदलतील तुमचं नशीब, नोकरी असो वा व्यवसाय, यश निश्चित

advertisement

एका युझरने सांगितलं की, त्याने जर्मनीच्या लोकप्रिय लॉटरी 'लोट्टो 6 ऑस 49' मध्ये 14.90 युरो म्हणजे 1350रुपये खर्च करून भाग घेतला. लॉटरीमध्ये 49 नंबरच्या निवडीतून 6 क्रमांक आणि 0 ते 9 दरम्यानचा बोनस क्रमांक निवडला जातो. त्या व्यक्तीने गुगल कोलाब, ग्रोक 3, जेमिनी 2.0 फ्लॅश, चॅटजीपीटी 4ओ आणि क्लॉड 3.7 सॉनेट यांनी केलेल्या गणनेच्या आधारे तिकीट खरेदी केले, पण तो हरला.

advertisement

(सूचना : हा लेख फक्त सर्वसामान्य माहितीसाठी देण्यात आला आहे. यात करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी न्यूज18मराठीने केलेली नाही किंवा याचं समर्थनही करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

मराठी बातम्या/Viral/
ChatGPT ला विचारला असा प्रश्न, महिला मालामाल, AI मुळे जिंकले तब्बल 1,32,00,000 रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल