एका महिला स्वतःच्या फायद्यासाठी 17 वेळा प्रेग्नंट राहिल्याची घटना समोर आलीय. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. इटलीतून समोर आलेली ही घटना वाचून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
Funny Video : सिंगल तरुणानं गर्लफ्रेंडसाठी लढवली हटके शक्कल, पाहून आवरणार नाही हसू
17 वेळा प्रेग्नंसीच्या फायद्यासाठी आणि सुट्टीसाठी महिला खोटं बोलली. महिलेच्या या कृत्याबाबत अधिकाऱ्यांना संशय आला आणि तिची चौकशी करताच तिचा खोटा प्लॅन उघड झाला. आपल्या फायद्यासाठी खोटं बोलणाऱ्या या महिलेचं नाव बार्बरा आहे.
advertisement
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बार्बराने तिच्या सर्वात लहान मुलाला जन्म दिल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस बार्बरा यांच्यावर बारीक नजर ठेवून होते. यावेळी पोलिसांना बार्बरा कधीच गरोदर नसल्याचे पुरावे मिळाले. ती फक्त गरोदर असल्याचं नाटक करत होती. पोलिसांनी सांगितलं की, एक कोटी रुपयांचे फायदे मिळवण्यासाठी आणि कामातून वेळ मिळावा म्हणून तिनं 17 बनावट प्रेग्नंसीचा प्लॅन केला.
Wild Life : जंगलात गाडी पाहून हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी आला आणि...
चौकशीनंतर सत्य समोर आलं की ती महिला कधीच गरोदर राहिली नव्हती आणि ती केवळ गर्भधारणेच्या फायद्यासाठी असं करत होती. मात्र, महिलेनं कागदपत्रांमध्ये 5 मुलांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. आजपर्यंत त्या मुलांना कोणी पाहिलं नाही.
याविषयी बोलताना बार्बरा म्हणते की, ती 17 वेळा आई होणार होती, पण तिला 12 वेळा गर्भपाताच्या परिस्थितीतून जावं लागलं. तिनं बेनेडेटा, अँजेलिका, अब्रामो, लेटिझिया आणि इस्माईल नावाच्या 5 मुलांना जन्म दिल्याचं सांगितलं परंतु तिच्याकडे या गोष्टींचा कोणताही पुरावा नाही. तिच्या पतीला विचारलं असता त्यानं सांगितलं की, त्याची पत्नी गरोदर नसल्याचं सांगितलं. त्यानंतर बार्बरासा अटक करण्यात आली आणि ती आता शिक्षा भोगत आहे.
