TRENDING:

नव्या घरात रहायला आली महिला, फरशीखाली जे दिसलं ते पाहून उडाला थरकाप

Last Updated:

नवीन घर खरेदी करताना लोक खूप विचार करतात. आपल्या सोयीनुसार आणि आपल्या सुविधेनुसार घर आहे का हे पाहून लोक खरेदी करतात. मात्र खरेदी केल्यानंतर काहींना घराविषयी धक्कादायक, विचित्र, भयानक गोष्टी समजतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : नवीन घर खरेदी करताना लोक खूप विचार करतात. आपल्या सोयीनुसार आणि आपल्या सुविधेनुसार घर आहे का हे पाहून लोक खरेदी करतात. मात्र खरेदी केल्यानंतर काहींना घराविषयी धक्कादायक, विचित्र, भयानक गोष्टी समजतात. मग तर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकते. अशा बऱ्याच घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. यामध्ये आणखी एका घटनेची भर पडलीय. एका महिलेनं नवं घर खरेदी केलं मात्र नंतर जे सत्य तिच्या समोर आलं त्यानं तिचा थरकापच उडाला.
फरशीखाली जे दिसलं ते पाहून उडाला थरकाप
फरशीखाली जे दिसलं ते पाहून उडाला थरकाप
advertisement

महिला नव्या घरात गेल्यावर तिला जे सत्य समजलं त्यामुळे तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिला नव्या घराच्या फरशीखाली भयानक गोष्ट सापडली. तिच्या नवऱ्यानं ती गोष्ट बाहेर काढल्यावर दोघंही शॉक झाले.

Shocking : विमानावर मधमाशांचा हल्ला, प्रवासी 90 मिनिट राहिले अडकून

मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेनं सोशल मीडिया साइट Reddit वर तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. काही दिवसांपूर्वी महिलेनं घर घेतलं असल्याचं सांगितले. जे व्हिक्टोरियन पद्धतीनं बांधलं होतं. ते दिसायला खूप सुंदर होतं. पण तिच्या पतीनं पहिलं पाऊल टाकताच फ्लोअरबोर्डखाली काहीतरी दिसलं. पतीनं फ्लोअरबोर्ड काढला तेव्हा ते पाहून धक्काच बसला. कारण जमिनीखाली एक मुखवटा पडलेला होता. तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

व्हिक्टोरियन काळात असे मुखवटे असायचे असं महिलेच्या पतीनं सांगितलं. जेव्हा कोणी मरण पावतं तेव्हा हे मुखवटे त्यांच्या चेहऱ्यावर लावले जायचे आणि नंतर ते नेऊन पुरले जायचे. त्यात त्या व्यक्तीचा आत्मा असतो असं मानले जातं. त्या मुखवट्यच्या मागे एक हुक होतो जो पाहून तो मुखवटा अडकवण्यासाठी बनवला असावा. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या मते, मृत्यूचे मुखवटे बनवण्याची कला प्राचीन इजिप्तची आहे. जेव्हा त्यांनी शिल्पकारांना चित्रे आणि थडग्यांचे पुतळे बनविण्यात मदत केली. व्हिक्टोरियन काळातही हे लोकप्रिय होते. इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ते शाही अंत्यसंस्काराच्या वेळी बनवले जायचे. याला फ्रेनोलॉजी म्हणतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
नव्या घरात रहायला आली महिला, फरशीखाली जे दिसलं ते पाहून उडाला थरकाप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल