अमेरिकेतील हे प्रकरण आहे. एका अमेरिकन आईने तिच्या कुटुंबासाठी टस्कन चिकन रेसिपी बनवली होती. पण ऑनलाइन ऑर्डर केलेल्या शुद्ध ग्रीक ऑलिव्ह ऑइलच्या बाटलीने जेवण खराब केलं. महिलेच्या मुलीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅमेरॉन जेनं असं या महिलेचं नाव आहे. तिने आपल्या आईच्या चिकनचा हा किस्सा सांगितला आहे.
हरवलेला फोन सापडला, आनंदी झाला, पण गॅलरी उघडली आणि घामच फुटला, असं काय होतं त्यात?
advertisement
मुलीने सांगितलं आईने चिकन मॅरीनेट केलं. नंतर सॉस बनवला. त्यात क्रीम, चीज, औषधी वनस्पती, सर्वकाही घातलं. किचनमध्ये तासभर घालवून जेवण बनवलं. पण जेव्हा जेवण वाढण्याची वेळ आली तेव्हा एका छोट्याशा चुकीमुळे सगळं उद्ध्वस्त झालं. जेव्हा कुटुंब जेवायला बसलं तेव्हा चिकनचा वास विचित्र आला. त्यामुळे संशय निर्माण झाला. आईने चिकनमध्ये काय टाकलं म्हणून मुलगी बघायला गेली आणि तिला धक्काच बसला. त्यांनी ते चिकन खाल्लंच नाही. सगळं चिकन कचऱ्याच्या डब्यात फेकलं.
व्हिडिओमध्ये बाटलीवर ऑलिव्ह ऑइल मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसत आहे परंतु 'शॉवर जेल' खूप लहान फॉन्टमध्ये लिहिलेलं होत. म्हणजे मुलीच्या आईने चिकमध्ये ऑलिव्ह ऑइल समजून शॉवर जेल टाकलं होतं. मुलीने सांगितले की तिच्या आईला या घटनेने खूप वाईट वाटले. तिला त्याचा त्रास झाला.
जगातील सगळ्यात खतरनाक रोटी, खाणं सोडा बनवतानाच होऊ शकतो मृत्यू
नंतरच्या व्हिडिओमध्ये कॅमरोनने दाखवलं की तिच्या आईने पुन्हा चिकन शिजवले, यावेळी खऱ्या तेलाने. "चुकांमधून शिकणे!" कुटुंबाने ते विनोदाने घेतले, परंतु साबण न खाण्याचा इशारा दिला.