TRENDING:

महिला स्वतःच्याच घरात खिडकीतून घुसते, Video पाहून आवरणार नाही हसू!

Last Updated:

सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजकाल सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात कोण कधी कोणाला कॅमेऱ्यात कैद करत असेल सांगता येत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजकाल सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात कोण कधी कोणाला कॅमेऱ्यात कैद करत असेल सांगता येत नाही. अचानकपणे कोणीही कोणाचा व्हिडीओ बनवताना दिसून येतं. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती स्वतःच्याच घरात खिडकीतून चढते.
महिला स्वतःच्याच घरात खिडकीतून घुसते
महिला स्वतःच्याच घरात खिडकीतून घुसते
advertisement

समोर आलेला हा व्हिडीओ लंडनचा आहे. महिला घराच्या चाव्या आत विसरते त्यामुळे तिला खिडकीतून आत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग ती ज्या प्रकारे मेहनत घेत आत जाते आणि घरात प्रवेश करते या सर्व घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिला तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओविषयी सांगते की नेमकं काय घडलं होतं. महिला घराच्या चाव्या घरातच विसरुन मार्केटला जाते. माघारी आल्यावर तिला आत जाण्यासाठी खिडकीचा वापर करावा लागतो. ती खिडकीला लटखून घरात प्रवेश करते. मात्र यादरम्यान, तिचा ड्रेसही अडकतो आणि ती उलटी लटकते. हे पाहून तिच्या बहिणीलाही हसू आवरत नाही.

advertisement

This Morning नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. व्हिडीओची चांगलीच चर्चा पहायला मिळाली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असे अनेक विचित्र, हटके, अजब व्हिडीओ समोर येत असतात.

मराठी बातम्या/Viral/
महिला स्वतःच्याच घरात खिडकीतून घुसते, Video पाहून आवरणार नाही हसू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल