काहीच दिवसांत त्या व्यक्तीने तिच्याशी प्रेम व्यक्त करत लग्नाचंही प्रपोजल दिलं. इतकंच नाही, तर त्याने त्या महिलेकडे खाजगी फोटो मागितले, ज्यावर तिने स्पष्ट नकार देऊन त्याला लगेच ब्लॉक केलं.
ती म्हणाली, “गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी एका व्यक्तीला भेटले. त्याच्याशी काही दिवस बोलले आणि नंतर त्याने लग्नाचं प्रस्ताव दिलं. मला ते विचित्र वाटलं कारण तो सुमारे 900 पेक्षा जास्त महिलांना फॉलो करत होता. त्यानंतर त्याने माझ्याकडे काही प्रायव्हेट फोटो मागितले, मी नकार दिला आणि त्याला ब्लॉक केलं. त्यानंतर माझं मन शांत होतं.”
advertisement
पण काही महिन्यांनी, जेव्हा तिने आपला फोन बदलला, तेव्हा ती चुकून पुन्हा त्या व्यक्तीचा नंबर अनब्लॉक झाला. “आज मला त्या नंबरवरून चार मिस्ड कॉल आले. मी पूर्णपणे त्याला विसरले होते,” असं ती म्हणाली. त्याने मेसेज करून लिहिलं होतं, “तू लवकरच प्रसिद्ध होशील,” हा मेसेज पाहून ती घाबरली.
महिलेने आणखी सांगितलं की, सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतरही अशा धमक्यांना ते गंभीरपणे घेत नाहीत. “ते फक्त म्हणतात, ‘मॅडम, हे फक्त धमक्या आहेत,’ पण काही झाल्यानंतरच कृती करतात,” असं ती म्हणाली. या पोस्टनंतर अनेक महिलांनी तिचं समर्थन केलं आणि सल्ला दिला की, ती पुन्हा कधीही त्या व्यक्तीशी संपर्क साधू नये. एका युजरने लिहिलं, “जर तू काही खासगी माहिती शेअर केली नाहीस, तर तुला घाबरण्याचं कारण नाही. फक्त त्याला पुन्हा ब्लॉक कर आणि शांत राहा.”
दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “अशा लोकांना उत्तर देणं म्हणजे त्यांच्या महत्व देणं. एकदा का तू उत्तर दिलंस की ते पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून पूर्णपणे दुर्लक्ष कर आणि पुढं जा.”
या घटनेनंतर पुन्हा एकदा हे स्पष्ट होतं की, सोशल मीडियावर संबंध ठेवताना सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणालाही आपली खासगी माहिती किंवा फोटो देण्यापूर्वी नीट विचार करा कारण एक चुकीचा निर्णय भीती, धमकी आणि त्रासाचं कारण बनू शकतो.
