इंग्लंडमधील ही महिला, लॉरा कोल्डमन असं तिचं नाव. 33 वर्षांच्या लॉराने फेसबुकवरील एका अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या शुक्राणूंचा वापर करून मुलाला जन्म दिला. 2018 साली ती सिंगल झाली. तिला आधीच सहा वर्षांचा मुलगा होता, प त्याला एक भाऊ असावा अशी तिला इच्छा होती. पण यासाटी आयव्हीएफसारख्या महागड्या पर्यायांऐवजी तिने फेसबुक ग्रुप्सद्वारे स्पर्म डोनर शोधण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2020 मध्ये एका ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर काही वेळातच एका पुरूषाने तिच्याकडे येऊन डोनर होण्याची ऑफर दिली. लॉराने इतर ग्रुपकडून डोनरबाबत माहिती गोळा केली, जिथं तिला सांगण्यात आले की तो विश्वासार्ह आहे.
नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI ने महिलेला केलं प्रेग्नंट, कसं काय?
डिसेंबर 2020 मध्ये ती पहिल्यांदाच त्या डोनरच्या घरी गेली. लॉराच्या म्हणण्यानुसार डोनर तिच्याशी एकही शब्द बोलला नाही. तो तिला त्याच्या बेसमेंटमधील एका खोलीत घेऊन गेला, जिथं तो 10 मिनिटांनी नमुना असलेली सीरिंज घेऊन परतला. लॉराने सेल्फ-इन्सेमिनेशन केलं, थोडा वेळ थांबली आणि नंतर घरी परतली. पुढील सात महिन्यांत, तिने ही प्रक्रिया आणखी 3 वेळा केली. शेवटी जुलै 2021 मध्ये ती गर्भवती राहिली. एप्रिल 2022 मध्ये तिने तिचा मुलगा कॅलम अँथनी रायनला जन्म दिला.
लॉरा म्हणते की कॅलम तिच्या आयुष्याचा प्रकाश आहे, पण तो सध्या बोलू शकत नाही. त्याला धोके समजत नाहीत आणि त्याच्या खोलीतून फर्निचर काढून टाकावं लागतं कारण तो प्रत्येक गोष्टीवर चढतो.
ती सध्या ऑटिझम चाचणी आणि स्पीच थेरपीसाठी दीर्घ प्रतीक्षा यादीत आहे. लॉराला वाटतं की तिच्या मुलाच्या समस्या डोनरच्या अनुवांशिक आरोग्याशी संबंधित असू शकतात. ती म्हणते, "मी न्यूरोडायव्हर्जंट नाही, पण त्याच डोनरपासून मुलं असलेल्या इतर महिलांच्या मुलांमध्येही असेच गुण दिसून आले आहेत."
Relationship : लग्न झाल्यानंतर बेबी प्लॅनिंग कधी करायचं? योग्य वेळ कोणती?
मिररच्या वृत्तानुसार लॉरा पुढे म्हणते, "मी माझ्या मुलाशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही, पण मी फेसबुकद्वारे कोणालाही स्पर्म डोनर शोधण्याचा सल्ला देणार नाही. ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. ती गुन्हेगार, मानसिक आजारी असू शकते आणि तुम्हाला त्यांच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही." तिने असंही म्हटलं की तिच्या मुलाच्या जन्मानंतर, तिने डोनरला माहिती दिली आणि काही अपडेट्स पाठवले. पण गेल्या वर्षभरापासून त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही,