TRENDING:

गावापासून ते हायवेपर्यंत, याठिकाणी महिला चालवतात बैलगाडी, काय आहे नेमकं यामागचं कारण?

Last Updated:

Women drive bullock carts - या महिलांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या समाजातील महिला या फक्त दुचाकी किंवा चारचाकीच नव्हे तर बैलगाडी चालवण्यातही तरबेज आहेत. याठिकाणी मुली आणि महिलांना वयाच्या 10 वर्षांपासून बैलगाडी चालवायला शिकवले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोहन ढाकले, प्रतिनिधी
बैलगाडी चालवताना महिला
बैलगाडी चालवताना महिला
advertisement

बुरहानपुर : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले नाव कमावत आहे. पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. यातच आता महिलांनी आणखी एक आदर्श निर्माण केला आहे. ठिल्लारी समाजाच्या महिलांच्या कार्याचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.

मध्यप्रदेशातील बुऱ्हाणूपर जिल्ह्यातील ठील्लारी समाजातील महिलांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या समाजातील महिला या फक्त दुचाकी किंवा चारचाकीच नव्हे तर बैलगाडी चालवण्यातही तरबेज आहेत. याठिकाणी मुली आणि महिलांना वयाच्या 10 वर्षांपासून बैलगाडी चालवायला शिकवले जाते.

advertisement

महिलांची भूमिका महत्त्वाची -

भोलाना क्षेत्रातील या समाजाचे तानु यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, आमचा ठील्लारी समाज हा प्रवास करत राहतो. त्यामुळे आम्ही 10 वर्षे वयाच्या मुलांना, महिलांना किंवा मुलांना बैलगाडी चालवायला शिकवतो. ते बैलगाडी चालवायला शिकतात. आमचे काम सोपे होऊन जाते. आम्ही माणसे जनावरांची काळजी घेण्यात व्यस्त असतो. त्यामुळे महिला बैलगाडी चालवून आमचा प्रवास पूर्ण करण्यात मदत करतात. यामध्ये मुलगी किंवा महिला, बैलगाडी कशी चालवायची हे सर्वांनाच माहीत आहे.

advertisement

जास्त तहान, भूक लागतेय, घामही खूप येतोय, ही लक्षण अजिबात दुर्लक्ष करू नका, काय असू शकतं यामागचं कारण?

प्रत्येक महिला बैलगाडी चालवण्यात तरबेज -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

भोलाना गावातील महिला बैलगाडी चालवण्यात तरबेज आहेत. ते बैलगाडीत सामान ठेऊन प्रवास पूर्ण करतात. ठिल्लारी समाजातील लोक मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यात फिरत राहतो. जिथे आपल्या जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे, तिथे आम्ही थांबतो. ठिल्लारी समाजातील महिलांमध्ये आता बैलगाडी चालवणे हे फक्त कौशल्यच नाही तर हे काम आता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग हिस्सा भाग बनला आहे. तसेच यामुळे त्या आत्मनिर्भर आणि धैर्यवान बनत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
गावापासून ते हायवेपर्यंत, याठिकाणी महिला चालवतात बैलगाडी, काय आहे नेमकं यामागचं कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल