दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागातील एका ज्वेलरी दुकानात दोन महिला अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. दुकानदाराने अंगठ्यांचे डबे उघडून त्यांना दाखवायला सुरुवात केली. त्या दोघी अंगठ्या पाहण्याचं नाटक करत असतानाच, दुकानात काम करणारी व्यक्ती काही क्षणांसाठी मागे वळते आणि नेमकं तेव्हाच त्यापैकी एक महिला सोन्याची खरी अंगठी आपल्या खिशात ठेवते आणि तिच्या जागी नकली अंगठी ठेवते.
advertisement
CCTV कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार
हा सगळा प्रकार काही सेकंदांमध्येच झाला. त्या महिलेनं इतक्या वेगात आणि चतुराईनं अंगठी बदलली की जर दुकानात CCTV कॅमेरा नसता, तर कुणालाही यावर विश्वास बसला नसता. दुकानदाराला सुरुवातीला काहीच शंका आली नाही. मात्र नंतर जेव्हा फुटेज पाहिलं गेलं तेव्हा सगळं सत्य उघड झालं.
35 सेकंदात संपलं सगळं, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
सुमारे 35 सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. X (पूर्वी ट्विटर) वर @mktyaggi या युजरनं तो शेअर करत लिहिलं “कमाल की तकनीक रहती है चोरों और ठगों की भी.” या पोस्टला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.
कमाल की तकनीक रहती है चोरों और ठगों की भी…
advertisementसोने की असली अंगूठी की जगह, नकली रख दी, लेकिन CCTV ने सब रिकॉर्ड कर लिया।
📍लक्ष्मीनगर, दिल्ली pic.twitter.com/TpCRjrMYf8
—
