वर्ल्डकपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला रंगणार आहे. हा सामना प्रत्यक्ष बघण्यासाठी जगभरातले नागरिक उत्सुक आहेत. त्यामुळे दूरदूरहून क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होतील, यात काही शंका नाही. हीच बाब लक्षात घेऊन आता विमानांचे तिकीट दरही वाढवण्यात आले आहेत. देशांतर्गत विमान उड्डाणांच्या किंमती 5 टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या किंमती 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
advertisement
जेव्हा कॅप्टन कूल त्याच्या मूळगावी जातो तेव्हा...20 वर्षांनी गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू
दरम्यान, देश-विदेशातून क्रिकेटप्रेमी दाखल होणार असल्याने केवळ विमान उड्डाणच महागलेलं नाही, तर अहमदाबादमध्ये हॉटेलचं भाडं, टॅक्सीचे दर, पार्किंग आणि खाद्यपदार्थही महागण्याची शक्यता आहे.
मोहम्मद शमीच्या 7 विकेट्सनं उफाळलं बायकोचं प्रेम, घटस्फोट कॅन्सल? म्हणते..., Video
अहमदाबादला जाण्यासाठी विमान उड्डाणांच्या किंमती खालीलप्रमाणे :
अंतरराष्ट्रीय
दुबई - इतर दिवशी : 10 हजार ते 15 हजार रुपये, सध्या : 70 हजार रुपये.
कॅनडा - इतर दिवशी : 50 हजार ते 1 लाख रुपये, सध्या : 1 लाख ते 1.80 लाख रुपये.
अमेरिका - इतर दिवशी : 50 हजार ते 1 लाख रुपये, सध्या : 1 लाख ते 2 लाख रुपये
न्यूझीलंड - इतर दिवशी : 40 हजार ते 80 हजार रुपये, सध्या : 80 हजार ते 1.40 लाख रुपये.
देशांतर्गत
दिल्ली - इतर दिवशी : 3 हजार ते 5 हजार रुपये, सध्या : 24 हजार रुपये.
मुंबई - इतर दिवशी : 2 हजार ते 4 हजार रुपये, सध्या : 25 हजार रुपये.
बंगळुरू - इतर दिवशी : 5 हजार ते 8 हजार रुपये, सध्या : 27 हजार रुपये.
हैदराबाद - इतर दिवशी : 6 हजार रुपये, सध्या : 30 हजार रुपये.
चेन्नई - इतर दिवशी : 6 हजार ते 8 हजार रुपये, सध्या : 18 हजार से 20 हजार रुपये.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g