कोपी लुवाक असं या कॉफीचे नाव आहे. या कॉफीला सिव्हेट कॉफी असंह म्हणतात. आशियाई देशांसह दक्षिण भारतात याचं उत्पादन केलं जातं. भारतात या कॉफीचे उत्पादन कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात होते. इंडोनेशियामध्ये आशियातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन होते
खास मांजरीची विष्ठा वापरली जाते
ज्या मांजरीच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते. त्या मांजराची प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहे. सिव्हेट ही मांजर. या मांजरीची शेपटी माकडाच्या शेपटीसारखी लांब असते. ही मांजर इकोसिस्टम राखण्यात महत्त्वाचं योगदान देते.
advertisement
मांजरीच्या विष्ठेपासून कॉफी कशी बनते?
सिव्हेट मांजरींना कॉफी बीन्स खायला आवडते. ती फक्त अर्धी कॉफी चेरी खाते. मांजरी चेरी पूर्णपणे पचवू शकत नाहीत कारण त्यांच्या आतड्यांमध्ये पाचक एंजाइम नसतात. अयोग्य पचनामुळे, खाल्लेले अन्न मांजरीच्या विष्ठेच्या रूपात बाहेर येते. न पचलेले कॉफी बीन्स स्टूलमधून काढून स्वच्छ केले जातात. बीन्स धुऊन ग्राउंड केले जातात आणि कॉफी तयार आहे.
लोकांना ही कॉफी का आवडते?
कॉफी थेट बनवता येते. पण जेव्हा ही कॉफी मांजरांच्या आतड्यांमधून जाते, तेव्हा ते पाचक एन्झाईम्ससोबत मिसळून कॉफी आणखी चांगली आणि पौष्टिक बनवतात. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालात असे म्हटले आहे की कॉफी बीन्स मांजरीच्या आतड्यातून गेल्यानंतर बीन्समधील प्रथिनांची रचना बदलते. ही कॉफी आम्लपित्त देखील दूर करते.
किंमत किती?
या कॉफीला सामान्य लोकांची नाही तर श्रीमंतांची कॉफी म्हणतात. त्याची किंमत 20 ते 25 हजार रुपये प्रति किलो आहे.
