TRENDING:

तरुण रस्त्याच्या मध्यभागी बेशुद्ध पडला, कुत्र्यानं केलं असं काम की ...

Last Updated:

कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असल्याचं म्हटलं जातं. माणूस जेवढा त्याला जीव लावतो तेवढाच तोही माणसांसोबत प्रेमळ आणि निष्ठावान असतो. त्यामुळे कुत्रा आणि माणसांच्या मैत्रीची नेहमीच उदाहरणे दिली जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असल्याचं म्हटलं जातं. माणूस जेवढा त्याला जीव लावतो तेवढाच तोही माणसांसोबत प्रेमळ आणि निष्ठावान असतो. त्यामुळे कुत्रा आणि माणसांच्या मैत्रीची नेहमीच उदाहरणे दिली जातात. दोघांच्या मैत्रीच्या, प्रामाणिकपणाच्या, निष्ठेच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना सध्या चर्चेत आली आहे.
तरुण रस्त्याच्या मध्यभागी बेशुद्ध पडला
तरुण रस्त्याच्या मध्यभागी बेशुद्ध पडला
advertisement

तरुण रस्त्याच्या मधोमध बेशुद्ध पडला होता आणि एक कुत्रा त्याचा बॉडीगार्ड म्हणून पहारा देत होता. याचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांची बॉन्डिंग पाहून तुम्हीही चकित व्हाल.

भररस्त्यात हत्तीला आला राग, दिसेल ते उचलून फेकू लागला; पाहा VIDEO

समोर आलेली घटना उत्तर प्रदेशमधील सहानपूरमधील आहे. याठिकाणी एक तरुण दारु पिऊन बेशुद्ध पडला होता. तो रस्त्याच्या मधोमध पडला होता मात्र कोणीही त्याला तेथून हटवलं नाही किंवा त्याची मदत केली नाही. तेवढ्यात एक कुत्रा तेथे येऊन थांबला. तरुणाच्या जवळून गाडी जाताना तो भुंकायचा. शेवटी तिछे पोलीस आले आणि त्यांनी तरुणाला तेथून हटवलं.

advertisement

पोलीस तेथे आल्यावर तो त्यांच्यावरही भुंकू लागला. पोलिसांनी त्याला बाजूला नेऊन तरुणाला शुद्ध येईपर्यंत तो कुत्रा तिथेच उभा होता. मग तरुणाला शुद्ध येताच कुत्रा आनंदी झाला आणि शेपूट हलवू लागला. तरुणानंही त्याचे लाड केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

पोलिसांनी तरुणाला विचारलं हा त्याचा कुत्रा आहे का? तर तरुण म्हटला नाही. मी त्याला दररोज काही ना काही खायला द्यायचो. त्यामुळे तो मला ओळखतो. या घटनेनंतर अनेकांनी कुत्र्याचं कौतुक केलं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
तरुण रस्त्याच्या मध्यभागी बेशुद्ध पडला, कुत्र्यानं केलं असं काम की ...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल